Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: रोहित ब्रिगेडसाठी श्रीलंका ठरणार खलनायक, ICC ट्रॉफी जिंकू देणार नाही!

Manish Jadhav

WTC Final 2023: टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये पोहोचण्यापासून एक पाऊल दूर आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अहमदाबाद येथे खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना जिंकला तर अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. त्याचवेळी, ऑस्ट्रेलिया आधीच WTC च्या विजेतेपदासाठी पात्र ठरला आहे.

श्रीलंका संघाचे टीम इंडियाचे स्वप्न भंगणार का?

श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या टीम इंडियाच्या (Team India) आशा संपुष्टात आणू शकतो. हे कसे होऊ शकते, आम्ही तुम्हाला या बातमीत सांगू. वास्तविक, जर टीम इंडियाने अहमदाबाद कसोटी जिंकली तर ते श्रीलंकेला अंतिम शर्यतीतून बाहेर काढेल.

दरम्यान, श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. करुणारत्नेच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने हे दोन्ही सामने जिंकले तरी ते अंतिम फेरी गाठू शकणार नाहीत.

पण अहमदाबाद कसोटीत टीम इंडिया हरली किंवा ड्रॉ झाली, तर श्रीलंकेसाठी अंतिम फेरीचा मार्ग खुला होईल. मात्र, हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा श्रीलंका (Sri Lanka) न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकेल.

दुसरीकडे, जर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धचा एकही कसोटी सामना जिंकला नाही, तर टीम इंडिया WTC फायनलसाठी पात्र ठरेल.

अशी आहे अहमदाबाद कसोटीची स्ठिती

सलामीवीर उस्मान ख्वाजाचे नाबाद शतक आणि त्याच्या तीन अर्धशतकांच्या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पहिल्या डावात चार गडी गमावून 255 धावा केल्या.

डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या ख्वाजाने 251 चेंडूंच्या खेळीत 15 चौकारांसह नाबाद 104 धावा केल्या आणि एक बाजू अबाधित ठेवली. त्याने ट्रॅव्हिस हेड (32) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 61, कर्णधार स्टीव्ह स्मिथ (38) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 79 आणि कॅमेरॉन ग्रीनसोबत (नाबाद 49, 64 चेंडू, आठ चौकार) पाचव्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली.

तसेच, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रात एकही विकेट गमावली नाही, संपूर्ण मालिकेतील पहिले सत्र ज्यामध्ये एकही विकेट पडली नाही.

संथ आणि सपाट खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बाद करणे भारतीय गोलंदाजांना कठीण गेले. रविचंद्रन अश्विन (1/57), रवींद्र जडेजा (1/49) आणि अक्षर पटेल (14 विकेटशिवाय) हे त्रिकूट खेळताना पाहुण्या संघाच्या फलंदाजांना फारसा त्रास झाला नाही. यजमान संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज मोहम्मद शमी होता, त्याने 65 धावांत 2 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live Update: 24/7 फॉर 2047! मोदींचा नवीन नारा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

SCROLL FOR NEXT