मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपले सिंहासन सोडले होते आणि भद्रबाहूसोबत श्रवणबेळगोळच्या टेकडीवर गेला; भगवान गोमटेश्वराचा शिलालेख

Western ganga dynasty: भगवान गोमटेश्वराचा शिलालेख प्रादेशिक भाषांच्या विशेषत प्राकृत भाषेच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीचे दर्शन घडवतो, ज्यामध्ये कोकणी आणि मराठी दोन्ही वैशिष्ट्ये व भाषेचा मजबूत प्रभाव दिसून येतो.
Western ganga dynasty, shravanabelagola gomateshwara, bahubali statue history
Western ganga dynasty, shravanabelagola gomateshwara, bahubali statue historyDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

पश्चिम गंग हे भारतातील एक महत्त्वाचे प्राचीन राजघराणे होते. बदामी चालुक्यांच्या उदयानंतर पश्चिमेतल्या गंगांनी चालुक्यांचे आधिपत्य स्वीकारले आणि कांचीच्या पल्लवांविरुद्ध त्यांच्या अधिपतींसाठी लढा दिला. दख्खनमधील प्रबळ सत्ता म्हणून चालुक्यांची जागा इसवी सन ७५३मध्ये मनयखेताच्या राष्ट्रकूटांनी घेतली.

स्वायत्ततेसाठी शतकानुशतके संघर्ष केल्यानंतर, पश्चिम गंगांनी शेवटी राष्ट्रकूट अधिराज्य स्वीकारले आणि त्यांच्या शत्रूंविरुद्ध, तंजावरच्या चोल राजवंशाविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला.

त्यांनी नियंत्रित केलेल्या क्षेत्राला ‘गंगवाडी’ असे म्हणतात आणि त्यात कर्नाटक राज्यातील म्हैसूर, हसन, चामराजनगर, तुमकुर कोलार, मंडया आणि बंगलोर या आधुनिक जिल्ह्यांचा समावेश होतो. पश्चिम गंगेचा राजा श्रीपुरुषाने पल्लव राजा नंदीवर्मन पल्लवमल्ल यांच्याशी यशस्वीपणे लढा देऊन, उत्तर अरकोटमथील पेनकुलीकोट्टईला तात्पुरते आपल्या नियंत्रणाखाली आणले ज्यासाठी त्याला ‘परमादी’ ही पदवी मिळाली.

हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ नावाच्या एका छोट्याशा शहराला लागून असलेल्या दोन टेकड्यांपैकी सर्वात उंच विंध्यगिरी (इंद्रगिरी) आणि चंद्रगिरी किंवा दोड्डा बेट्टा (मोठी टेकडी) आणि चिक्का बेट्टा (छोटी टेकडी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन खडकाळ टेकड्यांच्या पायथ्याशी श्रवणबेळगोळ हे शहर वसलेले आहे. जैनांचे हे एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र.

या ठिकाणाचा इतिहास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापर्यंतचा आहे, जेव्हा मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य आपल्या धर्मगुरू श्रुतकेवली भद्रबाहूसह येथे आले होते. श्रुतकेवली हे तीर्थंकरांचा उत्तराधिकारी होते.

मौर्य सम्राट चंद्रगुप्त, ज्याने आपले सिंहासन सोडले होते आणि जैन धर्म स्वीकारला होता, भद्रबाहूसोबत श्रवणबेळगोळच्या छोट्या टेकडीवर गेला होता, जिथे असे मानले जाते की गुरु आणि शिष्याने धार्मिक उपवास करून मृत्यूला आलिंगन दिले.

इथे श्रवणबेळगोळ भगवान गोम्मटेश्वराची मूर्ती बाहुबलीला समर्पित आहे जे शांतता, अहिंसा, सांसारिक व्यवहारांचा त्याग आणि साधी राहणी या जैन उपदेशांचे प्रतीक मानले गेले आहे. इथे महामस्तकाभिषेक म्हणून ओळखला जाणारा जैन कार्यक्रम जगभरातील भक्तांना आकर्षित करतो.

महामस्तकाभिषेक उत्सव दर १२ वर्षांनी एकदा आयोजित केला जातो, जेव्हा भगवान गोम्मटेश्वराच्या प्रतिमेला पाणी ,दूध, तूप ,नारळ व उसाचा रस इत्यादींनी स्नान केले जाते श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली पुतळ्याचे कोरीव काम करून घेण्याचे श्रेय १०व्या शतकातील गंग राजवंशाचे सरसेनापती चावुंदराय यांना दिले जाते.

जगाचा त्याग करून तपश्चर्येला उभ्या राहिलेल्या भगवान बाहुबलीची कहाणी ऐकून चावुंदरायची आई कलाला देवी उत्साहित झाल्या.

जगाचा त्याग करण्यापूर्वी भगवान बाहुबलीने राज्य केलेल्या पौंडनापुरा येथे बाहुबलीच्या सुवर्णमूर्तीचे दर्शन घेण्याची तिची व तिच्या पुत्र चावुंदरायची इच्छा होती. भगवान बाहुबलीची सोन्याची मूर्ती बाहुबलीचा थोरला भाऊ भरत याने पौंडनापुरा येथे स्थापित केल्याचे सांगितले जाते.

चावुंदरायांनी नियुक्त केलेला भगवान गोमटेश्वराची शिला प्राचीन कर्नाटकातील गंग शिल्पकला योगदानाचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. बारीक पांढऱ्या ग्रॅनाइटपासून कोरलेली ही प्रतिमा कमळावर उभी आहे.

त्याला मांड्यांपर्यंत आधार नाही आणि ती ५८ फूट (१८ मीटर) उंच आहे आणि चेहरा ६.५ फूट (२.० मीटर) आहे. प्रतिमेच्या चेहऱ्यावरील शांत भाव, सुंदर कुंडले असलेले त्याचे कुरळे केस, त्याची प्रमाणबद्ध शरीररचना, शिलेचा आकार आणि त्याची कलात्मकता आणि कारागिरी यांचे संयोजन यामुळे मध्ययुगीन कर्नाटकातील शिल्पकलेतील ती सर्वात मोठी कामगिरी असल्याचे म्हटले जाते.

ही जगातील सर्वात मोठी एका दगडावर कोरलेली मूर्ती आहे. महास्तंभ किंवा ब्रह्मस्तंभ नावाचे उभे असलेले खांब देखील अद्वितीय मानले जातात, ज्याची उदाहरणे ब्रह्मदेव स्तंभ आणि त्यागडा ब्रह्मदेव स्तंभ आहेत.

Western ganga dynasty, shravanabelagola gomateshwara, bahubali statue history
Goa Bread History: 1500च्या दशकात पोर्तुगिज आले, भारतात सर्वांत पहिला 'पाव' गोव्यात तयार झाला; इथून तो मुंबईत गेला..

या खांबांना फुलांच्या आकृत्यांनी सजवलेला आहे त्याच्या वरच्या बाजूला ब्रह्मा बसलेला आहे आणि खांबाच्या पायथ्याशी सामान्यतः महत्त्वाच्या जैन व्यक्तिमत्त्वांचे आणि शिलालेखांचे कोरीवकाम केलेले सापडते. श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली (गोम्मतेश्वर) यांच्या ५८ फूट उंच मूर्तीच्या डाव्या पायाजवळ एक प्रसिद्ध शिलालेख आहे. मजकूर पुढीलप्रमाणे:

श्री चावुंडराजेन करविले श्री गंगराजेन सुत्तालें करविले याचा अर्थ श्री चावुंडराजांनी हे बांधून दिले (कार्यान्वित केले). श्री गंगराजांनी सभोवतालची भिंत (सुत्तले/सुत्तलें) बांधून दिली.

Western ganga dynasty, shravanabelagola gomateshwara, bahubali statue history
Goa History: ‘पोर्तुगिजांनो चालते व्हा'! डॉ. गायतोंड्यांना अटक केली, 17 फेब्रुवारी 1955ला अनेक सत्याग्रही म्हापशाला जमा झाले..

असं पण म्हटले जाते की गोम्मतेश्वर(किंवा गोमटेश्वर), श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबलीची बहुतेकदा सुंदर (कोकणी शब्द गोमटो - सुंदर आणि ईश्वर - स्वामी) या शब्दावरून आलेला आहे तर काहींच्या म्हणण्याप्रमणे हे नाव कन्नड गोमाट टेकडीवर या शब्दावरून घेतले आहे. भगवान गोमटेश्वराचा श्रवणबेळगोळ शिलालेख प्रादेशिक भाषांच्या विशेषत प्राकृत भाषेच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीचे दर्शन घडवतो, ज्यामध्ये कोकणी आणि मराठी दोन्हींच्या भाषावैशिष्ट्यांचा प्रभाव दिसून येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com