साखळीतील किल्ल्याचं काम पूर्णत्वास, फेब्रुवारीच्या अखेरीस उद्घाटन; CM प्रमोद सावंतांची माहिती

Sankhali Fort restoration completion: साखळीच्या वैभवात भर टाकणारा आणि शहराच्या ऐतिहासिक वारशाचा साक्षीदार असलेला साखळी बाजारातील किल्ल्याचे काम पूर्णत्वास आलं आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: साखळीच्या वैभवात भर टाकणारा आणि शहराच्या ऐतिहासिक वारशाचा साक्षीदार असलेला साखळी बाजारातील किल्ल्याचे काम पूर्णत्वास आलं आहे. पुरातत्व खात्यातर्फे सुरू असलेले या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झालंय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाचा आढावा घेतला आणि या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटन लवकरच होणार असल्याची माहिती दिली.

फेब्रुवारीच्या अखेरीस उद्घाटन

किल्ल्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "किल्ल्याचे मुख्य काम आता अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात या किल्ल्याचे उद्घाटन केले जाईल." विशेष म्हणजे, या वास्तूचे महत्त्व आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आगामी डिसेंबर महिन्यात या किल्ल्यावर एक भव्य सांस्कृतिक सोहळा आयोजित येणार असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

CM Pramod Sawant
Goa Crime: बाप ओरडला अन् काळजाचा तुकडा कायमचा दुरावला! शाळेत न गेल्यानं वडील ओरडले, 12 वर्षांच्या चिमुरड्यानं गळफास घेत संपवलं जीवन

अतिक्रमणांवर चालणार हातोडा

पाहणी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पुरातत्व खाते आणि स्थानिक प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. किल्ल्याच्या सौंदर्यात बाधा ठरणारी सभोवतालची अतिक्रमणे तातडीने हटवणार असल्याचं यावेळी सांगितलं.

CM Pramod Sawant
Goa Coconut Price: नारळासह करवंटीलाही आला भाव! इंधन-प्लायवूड निर्मितीसाठी वापर; 100 रुपयांना एक टोपली दराने विक्री

साखळीच्या शिरपेचात मानाचा तुरा

साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनीही यावेळी आनंद व्यक्त केला. "हा ऐतिहासिक किल्ला साखळीच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याचे नूतनीकरण पूर्ण झाल्याने हे ठिकाण पर्यटकांचे प्रमुख केंद्र बनेल आणि साखळीसाठी ते एक भूषण ठरेल," असे त्यांनी सांगितले. किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर मोकळा केल्यामुळे स्थानिकांना आणि पर्यटकांना या ऐतिहासिक वास्तूचा अनुभव घेणे अधिक सुलभ होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com