Team India in ICC Tournaments:
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली रविवारी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाला 6 विकेट्सने पराभूत करत सहाव्यांदा वनडे वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले.
या पराभवामुळे पुन्हा एकदा भारतीय वरिष्ठ संघाचे आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. यापूर्वी भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही खेळला होता. पण त्यावेळीही कमिन्सच्याच नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी भारताला पराभूत केले होते.
गेल्या 10 वर्षात भारताच्या महिला आणि पुरुष वरिष्ठ संघांना आयसीसी स्पर्धांचे एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. गेल्या 10 वर्षात अनेकदा भारताच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी उपांत्य आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे.
भारताने अखेरचे विजेतेपद 2013 साली मिळवले होते. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंडमध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती.
त्यानंतर भारताच्या महिला आणि पुरुष संघाने मिळून तब्बल 17 आयसीसी स्पर्धा खेळल्या, ज्यामध्ये विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. या 17 स्पर्धांपैकी भारतीय संघाने 13 वेळा बाद फेरीत प्रवेश केला. मात्र, त्यातील एकाही स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद मिळवता आले नाही.
दरम्यान, भारतीय वरिष्ठ संघाला जरी आयसीसीचे विजेतेपद गेल्या 10 वर्षात मिळवता आलेले नसले, तरी 19 वर्षांखालील संघाने वर्ल्डकप जिंकले आहेत. नुकतेच याचवर्षी जानेवारीच्या अखेरीस 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने वर्ल्डकप विजेतेपद जिंकले होते.
2014 - पुरुष टी20 वर्ल्डकप (उपविजेते)
2014 - महिला टी20 वर्ल्डकप (साखळी फेरीत बाद)
2015 - पुरुष वनडे वर्ल्डकप (उपांत्य सामन्यात पराभूत)
2016 - पुरुष टी20 वर्ल्डकप (उपांत्य सामन्यात पराभूत)
2016 - महिला टी20 वर्ल्डकप (साखळी फेरीत बाद)
2017 - महिला वनडे वर्ल्डकप (उपविजेते)
2017 - चॅम्पियन्स ट्रॉफी (उपविजेते)
2018 - महिला टी20 वर्ल्डकप (उपांत्य सामन्यात पराभूत)
2019 - पुरुष वनडे वर्ल्डकप (उपांत्य सामन्यात पराभूत)
2020 - महिला टी20 वर्ल्डकप (उपविजेते)
2019-21 - कसोटी चॅम्पियनशीप (उपविजेते)
2021 - पुरुष टी20 वर्ल्डकप (साखळी फेरीत बाद)
2022 - महिला वनडे वर्ल्डकप (साखळी फेरीत बाद)
2022 - पुरुष टी20 वर्ल्डकप (उपांत्य सामन्यात पराभूत)
(2022 साली भारतीय महिला संघाला राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे भारतीय महिला संघाने रौप्य पदक जिंकले होते.)
2023 - महिला टी20 वर्ल्डकप (उपांत्य सामन्यात पराभूत)
2021-23 - कसोटी चॅम्पियनशीप (उपविजेते)
2023 - पुरुष वनडे वर्ल्डकप (उपविजेते)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.