Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: वनडे इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा आहे भारताचा रेकॉर्ड, 43 वर्षात...

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या 17 मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

Manish Jadhav

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या 17 मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच भारतात खेळवला जाणार आहे. या दृष्टिकोनातूनही ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे.

विशेष म्हणजे, भारतीय संघाने गेल्या काही वर्षांत जबरदस्त कामगिरी करुन ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. आम्ही तुम्हाला दोन्ही संघांची आकडेवारी सांगणार आहोत-

दरम्यान, दोन्ही संघांच्या एकदिवसीय सामन्यांच्या एकूण सामन्यांची आकडेवारी पाहिली तर ऑस्ट्रेलियन संघच वर्चस्व गाजवत असल्याचे दिसते.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 143 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 80 सामने जिंकले आहेत तर भारतीय संघाने केवळ 53 सामने जिंकले आहेत. तर 10 सामन्यांचा निकाल लागला नाही.

दुसरीकडे, हा आकडा फक्त भारतातच पाहिला तर इथेही ऑस्ट्रेलिया एक पाऊल पुढे आहे. येथे झालेल्या 64 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने 30 सामने जिंकले तर भारताने 29 सामने जिंकले. 5 सामने अनिर्णित राहिले. यावरुन हे स्पष्ट होते की, भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे इतके सोपे नाही.

तसेच, 43 वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने (Australia) पहिली 30 वर्षे भारताला वनडेत प्रगती करण्याची संधी दिली नाही. पहिल्या 30 वर्षात दोन्ही संघांनी 104 सामने खेळले, ज्यात ऑस्ट्रेलियाने 61 सामने जिंकले तर भारताने 35 सामने जिंकले.

यामध्ये 8 सामनेही अनिर्णित राहिले. 2010 पासून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर दिली आहे. 2010 पासून भारताने 39 सामने खेळले असून त्यात ऑस्ट्रेलियाने 19 सामने जिंकले आहेत. भारताने 18 सामने जिंकले आहेत तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.

त्याचबरोबर, विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची तयारी पूर्ण करण्यासाठी 14 सामने शिल्लक आहेत. भारताने शेवटच्या वेळी 2011 मध्ये त्यांच्याच देशात विश्वचषक जिंकला होता.

यावेळीही तो भारतातच (India) आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत संघाला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची सुवर्णसंधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: भाग्याची साथ! मेष-मिथुन राशींसह 'या' 5 राशींचा दिवस मंगलकारी; करिअर, नोकरी व व्यवसायात मिळेल सकारात्मक फळ

Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, सुपर-4 मधील 'हाय होल्टेज' सामना 'या' दिवशी रंगणार; जाणून घ्या वेळापत्रक

Rohan Desai: रोहन देसाई यांचे भवितव्य शुक्रवारी ठरणार, बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्यांच्या छाननी प्रक्रियेकडे लक्ष

Goa Weather Update: राज्यात मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT