ATK Mohan Bagan
ATK Mohan Bagan Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: 'एफसी गोवा'स नमवून एटीके मोहन बागानची सरशी

किशोर पेटकर

पणजी: एटीके मोहन बागानसाठी दोन गोल केलेला मनवीर सिंग, तसेच लिस्टन कुलासो एफसी गोवाच्या बचावफळीस भारी ठरला. त्यामुळे गतउपविजेत्यांनी 2-0 फरकाने सफाईदार विजय नोंदवून आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत 29 गुणांसह हैदराबाद एफसीला (Hyderabad FC) गाठले. (In The Indian Super League ATK Mohan Bagan Defeated FC Goa)

सामना मंगळवारी बांबोळी येथील अॅथलेटिक स्टेडियमवर झाला. समान गुण झाल्यानंतर आता हैदराबाद +20 गोलफरकासह अग्रस्थानी कायम आहे, तर +9 गोलसरासरीसह एटीके मोहन बागान दुसऱ्या स्थानी राहिले. मनवीरने पहिला गोल तिसऱ्याच, तर दुसरा गोल 46 व्या मिनिटास नोंदविला. हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानचा (ATK Mohan Bagan) हा सलग तिसरा, तर 15 लढतीतील एकंदरीत आठवा विजय ठरला. ते आता 11 सामने अपराजित आहेत.

एफसी गोवास (FC Goa) एटीके मोहन बागानविरुद्ध सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. पहिल्या टप्प्यातही याच प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध ते 2-1 फरकाने पराजित झाले होते. मंगळवारच्या पराभवामुळे डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या प्ले-ऑफ फेरी आशा आणखीनच अंधूक झाल्या. त्यांचा हा 17 लढतीतील सातवा पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे 18 गुण आणि नववा क्रमांक कायम राहिला.

एटीके मोहन बागानचे सेटपिसेस यश

सामना सुरू झाल्यानंतर लगेच एफसी गोवाला पिछाडीवर जावे लागले. सध्या जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या एटीके मोहन बागानच्या लिस्टन कुलासो व मनवीर सिंग यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे गोव्याच्या संघाला जोरदार झटका सहन करावा लागला. एफसी गोवाची सेटपिसेसवरील कमजोरी कायम राहिल्यामुळे कोलकात्याच्या संघाला आघाडी घेणे शक्य झाले. लिस्टनच्या भेदक कॉर्नर फटक्यावर मनवीर संधी साधताना शानदार हेडिंग गेले. चेंडूच्या वेगासमोर एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग हतबल ठरला.

मनवीरचा दुसरा गोल

उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर लगेच मनवीरने सामन्यातील दुसरा गोल नोंदवत एटीके मोहन बागानची आघाडी भक्कम केली. लेनी रॉड्रिग्जने एफसी गोवाच्या प्रिन्सटन रिबेलोकडून चेंडू हिसकावून घेत चाल रचली आणि मनवीर सुरेख पास दिला. त्याने ड्रिबलिंग छान प्रदर्शन करत गोलरक्षक धीरजला चकवा देत गोल केला. चार मिनिटानंतर मनवीरला लिस्टनच्या असिस्टवर हॅटट्रिकची संधी होती, परंतु तो यावेळी गोलरक्षक धीरजची एकाग्रता भंग करू शकला नाही. त्यानंतर लगेच लिस्टनच्या आणखी एका असिस्टवर जॉन कौको याचा नेम चुकल्यामुळे एटीके मोहन बागानची आघाडी आणखी वाढू शकली नाही. सामन्यातील पंधरा मिनिटे बाकी असताना लिस्टन व मनवीर यांनी एफसी गोवाच्या गोलक्षेत्रात खोलवर चढाई केली, मात्र गोलरक्षक धीरज व बचावपटू अन्वर अलीच्या सावध पवित्र्यामुळे त्यांना यश मिळाले नाही.

एफसी गोवाच्या संधी वाया

पूर्वार्धात एफसी गोवाने बरोबरीसाठी आटोकाट प्रयत्न केले, पण त्यांच्या संधी वाया गेल्या. सामन्याच्या सोळाव्या मिनिटास होर्गे ओर्तिझ प्रतिस्पर्धी गोलरक्षक अमरिंदर सिंगचा बचाव भेदू शकला नाही. 34व्या मिनिटास त्यांना नशीबाची साथ लाभली नाही. ब्रँडन फर्नांडिसच्या प्रतिहल्ल्यावर अन्वर अलीने ताकदवान फटका मारला. यावेळी गोलरक्षक अमरिंदरचा अंदाज चुकला, परंतु चेंडू क्रॉसबारला आपटल्यामुळे एटीके मोहन बागानचे नुकसान झाले नाही.

प्रकाशव्यवस्थेत गडबड

विश्रांतीला दोन मिनिटे बाकी असताना स्टेडियमवर प्रकाशझोत व्यवस्थेत गडबड झाली. विद्युतझोताच्या खांबावरील दिवे गेल्यामुळे सामना काही काळ खंडित झाला.

दृष्टिक्षेपात सामना...

  • - एटीके मोहन बागानच्या मनवीर सिंगचे यंदा 5 गोल, आयएसएलमध्ये एकूण 14 गोल

  • - स्पर्धेत 7 गोल केलेल्या एटीके मोहन बागानच्या लिस्टन कुलासोचे यंदा 4 असिस्ट

  • - एटीके मोहन बागान एफसी गोवाविरुद्ध सलग 2 विजयासह 4 सामने अपराजित

  • - पहिल्या टप्प्यात एटीके मोहन बागानचा 2-1 फरकाने विजय

  • - एटीके मोहन बागान यंदा आयएसएलमध्ये सलग 11 सामने अपराजित, 6 विजय आणि 5 बरोबरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT