VIDEO: पाकड्यांनी पुन्हा कॉपी केला भारतीय शो! समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'नंतर आता 'पाकिस्तान गॉट लेटेंट'ची चर्चा; राखी सावंतच्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

Pakistan Copied Samay Raina Show: भारतातील आघाडीचा स्टँडअप कॉमेडियन समय रैना याचा सुप्रसिद्ध कॉमेडी शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ची संपूर्ण संकल्पना चोरुन पाकिस्तानने आता ‘पाकिस्तान गॉट लेटेंट’ हा शो सुरु केला.
Pakistan Copied Samay Raina Show
Pakistan Copied Samay Raina ShowDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Pakistan Copied Samay Raina Show: भारतीय चित्रपट, मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोची नक्कल करण्याची पाकिस्तानची जुनी सवय पुन्हा एकदा समोर आली. भारतातील आघाडीचा स्टँडअप कॉमेडियन समय रैना याचा सुप्रसिद्ध कॉमेडी शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ची संपूर्ण संकल्पना चोरुन पाकिस्तानने आता ‘पाकिस्तान गॉट लेटेंट’ हा शो सुरु केला. विशेष म्हणजे, या पाकिस्तानी शोच्या नव्या सीझनच्या प्रोमोमध्ये भारतीय अभिनेत्री आणि ड्रामा क्वीन राखी सावंत पाहुणी परीक्षक म्हणून दिसत असल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली.

सध्या सोशल मीडियावर ‘पाकिस्तान गॉट लेटेंट’च्या आगामी सीझनचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत पाकिस्तानचे प्रसिद्ध विनोदी कलाकार शकील सिद्दीकी आणि रऊफ लाला यांच्यासोबत शोचा प्रचार करताना दिसत आहे. या एपिसोडच्या परीक्षक मंडळात शकील सिद्दीकी आणि राखी सावंत यांच्यासह शरहबिल सिद्दीकी, उस्मान मजहर आणि मुज्जमिल मेसिया यांचाही समावेश आहे. भारतातील (India) शोचा दुसरा सीझन तुफान गाजत असतानाच, पाकिस्ताननेही आपल्या कॉपी केलेल्या शोचा दुसरा सीझन जाहीर केला. यापूर्वी 2024 मध्येही त्यांनी या शोचा पहिला सीझन आणला होता.

Pakistan Copied Samay Raina Show
How to make Rakhi At Home: रक्षाबंधनाला घरीच बनवा 10 मिनिटांत सुंदर राखी! भावाला आवडेल तुमची क्रिएटिव्हिटी अन् मिळेल खास गिफ्ट

भारतीय मनोरंजन विश्वातील आशय कॉपी करण्याची ही पाकिस्तानची पहिलीच वेळ नाही. याआधीही शेजारील देशाने सनी देओलचा गाजलेला चित्रपट ‘दामिनी’ आणि श्रीदेवीच्या ‘जुदाई’ चित्रपटाची कथा जशीच्या तशी कॉपी करुन चित्रपट बनवले होते. इतकेच नव्हे, तर भारतातील अत्यंत लोकप्रिय सिटकॉम मालिका ‘साराभाई वर्सेस साराभाई’ची देखील नक्कल करत त्यांनी तसाच शो आपल्या देशात तयार केला होता. आता समय रैनाच्या मूळ शोप्रमाणेच हा कॉपी केलेला ‘पाकिस्तान गॉट लेटेंट’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.