Indian Super League: जमशेदपूर एफसीने  केरळा ब्लास्टर्सला दिला दणका

जमशेदपूर एफसीने (Jamshedpur FC) केरळा ब्लास्टर्सला पराभवाचा दणका देत आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या स्थानी उडी घेतली.
Daniel Chima Chukvu
Daniel Chima ChukvuDainik Gomantak

पणजी ः ग्रेग स्टुअर्टचे पेनल्टीवरील दोन गोल, तसेच डॅनियल चिमा चुक्वू याचा अचूक नेम या बळावर जमशेदपूर एफसीने केरळा ब्लास्टर्सला पराभवाचा दणका देत आठव्या इंडियन सुपर लीग (IndianSuperLeague) फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या स्थानी उडी घेतली. अव्वल स्थानावरील हैदराबाद एफसीपेक्षा त्यांचा आता फक्त एक गुण कमी आहे. (Jamshedpur FC Defeated Kerala Blasters In The Indian Super League Football Tournament)

बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या लढतीत स्कॉटलंडचा 31 वर्षीय स्टुअर्ट याने अनुक्रमे 45 व 48 व्या मिनिटास पेनल्टी फटका योग्य दिशेने मारून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्याने स्पर्धेतील 14 लढतीत सात गोल केले आहेत. नंतर नायजेरियन चुक्वू याने सलग तिसऱ्या लढतीत गोल करताना 53 व्या मिनिटास जमशेदपूरची (Jamshedpur FC) आघाडी 3-0 अशी भक्कम केली. तीस वर्षीय आघाडीपटूने आता स्पर्धेत पाच गोल नोंदविले आहेत.

Daniel Chima Chukvu
Indian Super League: एटीके मोहन बागानची अपराजित कूच

जमशेदपूरचा हा 14 लढतीतील सातवा विजय ठरला. त्यांचे आता 25 गुण झाले असून दुसरा क्रमांक मिळाला आहे. केरळा ब्लास्टर्सला तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 14 लढतीनंतर 23 गुण कायम राहिल्यानंतर त्यांना पाचव्या स्थानी घसरावे लागले. समान गुणांत चांगल्या गोलसरासरीमुळे बंगळूर संघ तिसऱ्या, एटीके मोहन बागान संघ चौथ्या स्थानी आला.

मागील लढतीत जमशेदपूरला बंगळूरुकडून (Bangalore) पराभव स्वीकारावा लागला होता. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने गुरुवारी सुरेख खेळ करत केरळा ब्लास्टर्सला चुका करण्यास भाग पाडले. विश्रांतीपूर्वी त्यांच्या देनेचंद्रम मेतेई याने स्टुअर्टला पाडल्यानंतर रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली, त्यावेळी गोलरक्षक प्रभसुखन गिल याला चकविताना विशेष प्रयास पडले नाहीत. विश्रांतीनंतर लगेच केरळा ब्लास्टर्सच्या मार्को लेस्कोविच याने बोरिस सिंगला पाडले आणि दुसऱ्यांदा जमशेदपूरला पेनल्टी फटका मिळाला. या वेळेसही स्टुअर्टचा नेम चुकला नाही. फ्रीकिक फटक्यावर बोरिसकडून चेंडू मिळाल्यानंतर डॅनियल चुक्वू याने फटक्यासाठी योग्य जागा निवडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com