Shreyas Iyer Six 
क्रीडा

IND vs SL: श्रेयसच्या 106 मीटरच्या सिक्सनं घाबरवलं चहल-धनश्री अन् रोहित-सूर्याच्या बायकोला, पाहा Video

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Sri Lanka, Shreyas Iyer 106 meter Six:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी भारत विरुद्ध श्रीलंका संघात सामना सुरु आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर 358 धावांचे आव्हान ठेवले आहे. दरम्यान, या सामन्यात श्रेयस अय्यरच्या एका षटकाराची चांगलीच चर्चा होत आहे.

या सामन्यात श्रेयस अय्यरने 3 चौकार आणि 6 षटकारांसह 56 चेंडूत ८६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३६ व्या षटकात कसून रजिता विरुद्ध खेळताना चौथ्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला. त्याने रजिताच्या डोक्यावरून सरळ स्टँडमध्ये हा षटकार मारला.

विशेष म्हणजे त्याने मारेलल्या या षटकारामुळे चेंडू जिथे पडला तिथे सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टी, रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह, आर अश्विनची पत्नी प्रीती नारायण आणि युजवेंद्र चहल व त्याची पत्वी आणि डान्सर धनश्री वर्मा बसले होते. ज्यावेळी श्रेयसने हा षटकार मारला, त्यावेळी ते पटकन उठून बाजूला झाले.

श्रेयसचा सर्वात लांब षटकार

दरम्यान, श्रेयसने कसून रजिताच्या गोलंदाजीवर मारलेला हा षटकार 106 मीटर लांब गेला होता. त्यामुळे तो वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्वात लांब षटकार मारणारा खेळाडूही ठरला, त्याने ग्लेन मॅक्सवेलच्या न्यूझीलंड विरुद्ध धरमशाला येथे मारलेल्या 104 मीटरच्या षटकाराच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे वर्ल्डकप 2023 मध्ये 100 मीटरहून अधिक लांब षटकार मारण्याची श्रेयसची ही दुसरी वेळ होती. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 101 मीटर लांब षटकार मारला होता.

भारताने श्रीलंकेसमोर 358 धावांचे आव्हान

या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर व्यतिरिक्त विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनीही अर्धशतके केली. मात्र, तिघांचीही शतकाची संधी अगदी थोडक्यात हुकली. पण, त्यांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या.

विराटने 11 चौकारांसह 88 धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलने 92 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 92 धावांची खेळी केली.

श्रीलंकेकडून दिलशान मदुशनकाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच दुश्मंता चमीराने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT