World Cup 2023: द. आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तानच्या उंचावल्या आशा! जाणून घ्या 9 संघांसाठी सेमीफायनलचे समीकरण

World Cup 2023 Semi-Final: वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी 9 संघात सध्या शर्यत आहे.
South Africa
South Africa
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023 Semi-Final Qualification Scenario:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी (1 नोव्हेंबर) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 190 धावांनी पराभूत केले. त्यामुळे गुणतालिकेतही उलटफेर झाले असून न्यूझीलंडसाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात विजय मिळवला असल्याने आता ते 7 सामन्यांतील 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल क्रमांकावर आले आहेत. भारतीय संघानेही 6 पैकी 6 सामने जिंकल्याने 12 गुण आहेत. मात्र त्यांचा नेट रनरेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा कमी असल्याने ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

तसेच न्यूझीलंड मात्र, सलग तीन पराभवांमुळे चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांनी 7 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले असल्याने त्यांचे 8 गुण आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांचेही 6 गुण असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अनुक्रमे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहेत. पाकिस्तानने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर अफगाणिस्तानने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचे सघ्या 6 गुण आहेत, पण नेट रनरेटमुळे पाकिस्तान पाचव्या आणि अफगाणिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे.

श्रीलंका आणि नेदरलँड्स प्रत्येकी 6 सामन्यांपैकी 2 विजयांसह 4 गुण मिळवत अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत.

तसेच 9 व्या आणि 10 व्या क्रमांकावर अनुक्रमे बांगलादेश आणि इंग्लंड असून त्यांनी आत्तापर्यंत एकच सामना जिंकला आहे. पण इंग्लंडचे आव्हान अद्याप जिवंत आहे, मात्र बांगलादेश 7 सामन्यांत एकच सामना जिंकल्याने ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.

South Africa
World Cup 2023: ऑस्ट्रेलियाला धक्का! मॅक्सवेल जखमी, तर 'हा' खेळाडूही अचानक परतला घरी

त्यामुळे आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सध्या 10 पैकी 9 संघांचे आव्हान जिवंत आहे. यातील आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेसाठी हे समीकरण सर्वात सोपे आहे. कारण भारत आणि दक्षिण आफ्रिकेला आता केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.

तसेच त्यांनी त्यांचे पुढील सर्व सामने पराभूत झाले, तरी त्यांचे 12 गुण असतील. तसेच त्यांच्याव्यतिरिक्त तीन संघ आहेत, जे 12 गुणांपर्यंत पोहचू शकतात. त्यामुळे त्यांनी त्यांचा नेट रन रेट चांगला ठेवला, तरी ते सहज उपांत्य फेरीत पोहचतील.

उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला सर्व सामने जिंकणे गरजेचे असणार आहे. पण जरी त्यांना एक किंवा दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला, तर त्यांना आशा करावी लागेल की अफगाणिस्तानने दोन आणि श्रीलंका, पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांनी किमान 1 सामना पराभूत व्हावा.

तसेच न्यूझीलंडला मात्र आता उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागणार आहेत. त्याचबरोबर त्यांना 12 गुण मिळवू शकणाऱ्या संघांपेक्षा नेट रन रेटही चांगला ठेवावा लागणार आहे.

तसेच जरी त्यांनी पुढील दोन्ही सामने पराभूत झाले, तर त्यांना आशा करावी लागेल की अफगाणिस्तानने उर्वरित सर्व सामने पराभूत व्हावे, तर श्रीलंका आणि नेदरलँड्स यांनी तीन पैकी दोन सामन्यात तरी पराभव स्विकारावा. तसेच पाकिस्तानने जरी त्यांच्याविरुद्ध विजय मिळवला, तरी एक पराभव स्विकारावा आणि त्यांच्यापेक्षा नेट रनरेट चांगला असावा.

South Africa
World Cup 2023: क्विंटन डी कॉकचा पुण्यात झंझावात, ठोकले चौथे 'शतक'; हिट मॅनच्या रेकॉर्डपासून...

दरम्यान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यासाठी आव्हान जिवंत असले, तरी त्यांना उपांत्य फेरी गाठणे सोपे असणार नाही.

अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत जाण्यासाठी पुढील तीनही सामन्यात विजय मिळवावे लागणार आहेत, पण याबरोबरच त्यांना आशा करावी लागेल की भारत आणि दक्षिण आफ्रिकेने त्यांचे पुढील सर्व सामने पराभूत व्हावे, तसेच ऑस्ट्रेलिया कमीत कमी 2 आणि न्यूझीलंडने 1 पराभव स्विकारावेत.

तसेच ते केवळ एका विजयासह देखील उपांत्य फेरी गाठू शकतात, पण त्यासाठी त्यांना 8 गुणांपर्यंत पोहचू शकणाऱ्या सर्व संघांनी पराभव स्विकारावा अशी आशा ठेवावी लागेल, तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपेक्षा चांगला नेट रेन रेटही ठेवावा लागेल.

तसेच पाकिस्तान जास्तीत जास्त 10 धावांपर्यंत पोहचू शकत असल्याने त्यांना उपांत्य फेरीत पोहचायचे असेल, तर त्यांना उर्वरित दोन सामने, तर जिंकावे लागतीलच, पण याबरोबरच त्यांना आशा करावी लागेल की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांनी त्यांचे सर्व सामने पराभूत व्हावेत.

तसेच श्रीलंका आणि नेदरलँड्सनेही 2 पराभव स्विकारावे. त्याचबरोबर त्यांना अफगाणिस्तानप्रमाणेच एका विजयासह देखील उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे, पण त्यांनाही 8 गुणांपर्यंत पोहचू शकणाऱ्या संघांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

नेदरलँड्स आणि श्रीलंका या संघांनाही अजूनही उपांत्य फेरीची दारं उघडी आहेत, पण त्यांना त्यांचे पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. तसे झाल्यास ते अजूनही जास्तीत जास्त 10 गुण मिळवू शकतात.

पण, याबरोबरच त्यांना आशा करावी लागेल की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने सर्व सामने पराभूत व्हावेत. त्याचबरोबर त्यांना मोठ्या फरकानेही विजय मिळवावे लागतील, जेणेकरून 10 गुण मिळवणाऱ्या संघांना नेट रनरेटच्या जोरावरही मागे टाकता येईल.

इंग्लंडसाठी सध्यातरी सर्वात कठीण आव्हान आहे. कारण इंग्लंडने उर्वरित तीनही सामने जिंकले, तर आता केवळ 8 गुणांपर्यंत पोहचू शकतात.

मात्र, सध्या पहिल्या चारही क्रमांकावर असलेल्या संघांनी 8 गुणांचा टप्पा आधीच गाठलेला आहे. अशात त्यांना जर अजूनही उपांत्य फेरी गाठायची असेल, तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने अफगाणिस्तानने सर्व सामने मोठ्या फरकाने हरण्याची अपेक्षा करावी लागेल. जेणेकरून नेट रन रेटच्या फरकाने त्यांना मागे टाकता येईल.

इतकेच नाही, तर नेदरलँड्स आणि श्रीलंका या संघांनीही किमान दोन-दोन पराभव स्विकारावे अशी अपेक्षा करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com