High Tide Waterlogging: खाडीच्या पाण्याचा नेवगीनगरला वेढा; महानगरपालिका कायमस्वरूपी उपाय कधी करणार?

Rua de Ourem Creek Flooding: समुद्रातील भरतीमुळे रुअं दी ओरें खाडीतील पाणी नेवगीनगरातील जुन्या मडगावमार्गे सांताक्रूझकडे जाणाऱ्या रस्त्यावर येत आहे.
Rua de Ourem Creek Flooding
High Tide WaterloggingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: समुद्रातील भरतीमुळे रुअं दी ओरें खाडीतील पाणी नेवगीनगरातील जुन्या मडगावमार्गे सांताक्रूझकडे जाणाऱ्या रस्त्यावर येत आहे. मात्र, या समस्येवर अद्याप महानगरपालिकेला उपाय शोधता आलेला नाही. नेवगीनगरातील काही इमारतींना या पाण्याचा वेढा पडत असून, येथील व्यावसायिक आणि पेट्रोल पंपधारकालाही याचा फटका सहन करावा लागत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सकाळच्या वेळी भरती येत असल्याने खाडीतील पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे नेवगीनगरातील केणी पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर तसेच समोरील अपार्टमेंटभोवती पाण्याचा वेढा पडत आहे.

Rua de Ourem Creek Flooding
ABVP Goa University Election: गोवा विद्यापीठात अभाविपचा क्लीन स्वीप; सर्व 9 जागांवर विजय, एनएसयूआयचा धुव्वा

ओहोटी सुरू झाल्यानंतरच येथील पाण्याची पातळी कमी होते. मात्र, हा प्रकार काही आजचा नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. यावर उपाय म्हणून खाडीकिनारी मजबूत संरक्षक कठडा उभारणे गरजेचे आहे; मात्र, तो अद्याप उभारण्यात आलेला नाही. महानगरपालिकेने यावर उपाययोजना करण्यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी असलेल्या अपार्टमेंटमध्ये अलीकडे काही व्यवसाय सुरू झाले आहेत. या व्यावसायिकांनाही भरतीच्या पाण्याचा वारंवार फटका बसत असतो. गेल्या दोन दिवसांपासून भरतीची वेळ एकसारखी राहिल्याने सलग पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. हे पाणी केणी पेट्रोल पंपापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.

Rua de Ourem Creek Flooding
One Goa Project Stay: कारापूरमधील 'लोढा' प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; बांधकामासह परवानग्यांना स्थगिती

कायमस्वरूपी उपाय आवश्यक

महानगरपालिकेने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या परिसरातील सोसायट्या ज्या प्रभागात येतात, त्या प्रभागातील नगरसेवकाला या समस्येची पूर्ण कल्पना आहे. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ते आग्रह का धरत नाहीत, असा प्रश्न येथील व्यावसायिकांनी प्रसारमाध्यमांद्वारे उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

ST Reservation
Packaged Food Warning Labels
Goa High Court POSH Act
goa administration red-tapism editorial