World Cup 2023: ऑस्ट्रेलियाला धक्का! मॅक्सवेल जखमी, तर 'हा' खेळाडूही अचानक परतला घरी

Australia Cricket: ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्धच्या आगामी सामन्यापूर्वी मोठे धक्के बसले असून त्यांचे दोन ऑलराऊंडर सामन्यातून बाहेर झाले आहेत.
Australia
AustraliaDainik Gomantak
Published on
Updated on

Big Blow for Australia in ICC ODI Cricket World Cup 2023 as their Two All-Rounders ruled out of England Match:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे झुकत आहे. अशात पहिल्या चार स्थानात येण्यासाठी संघांमध्ये चढाओढही दिसत आहे. अशातच पाचवेळच्या ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे दोन खेळाडू आगामी 4 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श हे दोघेही इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दिसणार नाही. मॅक्सवेलला काही दिवसांपूर्वी गोल्फ कोर्सवर दुखापत झाली. त्यामुळे त्याला कन्कशनच्या कारणाने हा सामना खेळता येणार नाही, पण तो पुढील सामन्यांसाठी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.

Australia
World Cup Points Table: जलवा हैं हमारा! टीम इंडिया विजयाचा सिक्सर लगावत 'अव्वल', तर गतविजेते गाळात

मात्र, मार्श त्याच्या वैयक्तिक कारणामुळे घरी परतला आहे. याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली आहे. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार तो नंतर पुन्हा उर्वरित वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी येणार आहे की नाही, याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे.

महत्त्वाचे म्हणजे मॅक्सवेल आणि मार्श हे दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मार्शने एका शतकासह या स्पर्धेत 225 धावा केल्या आहेत आणि 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मॅक्सवेलने एका शतकासह 196 धावा केल्या आहेत आणि 4 विकेट्स घेतल्या आहेत.

आता इंग्लंडविरुद्ध त्यांच्याजागेवर खेळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे ऍलेक्स कॅरे, सीन ऍबॉट, मार्कस स्टॉयनिस आणि कॅमेरॉन ग्रीन या खेळाडूंचे पर्याय आहेत. तसेच तन्वीर संघा हा फिरकीपटू राखीव खेळाडूंमध्ये आहेत.

Australia
World Cup 2023 Points Table: दक्षिण आफ्रिका पॉंइट टेबलमध्ये 'अव्वल', न्यूझीलंडच्या पराभवाचा कांगारुंना फायदा!

दरम्यान, जर मार्श या स्पर्धेतून बाहेर झाला, तर त्याच्याऐवजी बदली खेळाडू संघात घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेटला आयसीसीच्या स्पर्धेच्या तांत्रिक समीतीकडून परवानगी मागावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आत्तापर्यंत 6 पैकी 4 सामने या स्पर्धेत जिंकले आहे, तर त्यांनी २ सामने पराभूत झाले आहेत.

असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ -

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, ऍलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन ऍबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅब्युशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com