U19 India Team Dainik Gomantak
क्रीडा

U19 World Cup 2024: वेळापत्रकाची घोषणा! श्रीलंकेत रंगणार थरार, पाहा कधी होणार भारताचे सामने

U19 World Cup 2024 Schedule: आयसीसीने पुढीलवर्षी 16 संघांत होणाऱ्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

ICC announced U19 Men's Cricket World Cup 2024 Schedule :

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढीलवर्षी श्रीलंकेत होणाऱ्या 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. हा वर्ल्डकप 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार आहे. हा 19 वर्षांखालील गटात खेळला जाणारा 15 वा वर्ल्डकप असणार आहे.

या स्पर्धेत गतविजेत्या भारतासह एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. 13 जानेवारी रोजी यजमान श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे सामन्याने या स्पर्धेची सुरूवात होईल. या स्पर्धेचा अंतिम सामना 4 फेब्रुवारी रोजी कोलंबोमधील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

या स्पर्धेतील सामने एकूण 5 स्टेडियवर होणार आहेत. श्रीलंकेतील नोंदेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब, आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियम, पी सारा ओव्हल कोलंबो स्टेडियम, कोलंबो क्रिकेट क्लब, सिंघालिज स्पोर्ट्स क्लब या ठिकाणांवर सामने होणार आहेत.

या स्पर्धेसाठी श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांनी थेट पात्रता मिळवली आहे. त्याचबरोबर नामिबिया, नेपाळ, न्यूझीलंड, स्कॉटलंड, युएसए या संघांनी क्वालिफिकेशन स्पर्धेतून पात्रता मिळवली आहे.

असा खेळला जाणार वर्ल्डकप

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 16 संघांची चार गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक संघ साखळी फेरीत आपापल्या गटात 3 सामने खेळणार आहेत. त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ असे मिळून 12 संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील. त्याचबरोबर प्रत्येक गटात चौथ्या क्रमांकावर राहिलेले संघ एकमेकांबरोबर अखेरचा सामना खेळतील आणि आपला प्रवास थांबवतील.

या 12 संघांचे दोन गटात विभाजन करण्यात येईल. साखळी फेरीतील ए आणि डी गटातील सुपर 12 साठी पात्र ठरलेल्या तीन-तीन संघांचा मिळून एक गट होईल, तर बी आणि सी गटातील तीन-तीन संघांचा मिळून दुसरा गट होईल.

त्याचबरोबर सुपर 12 मध्ये प्रत्येक संघ दोन सामने खेळेल. म्हणजेच प्रत्येक संघ आपल्या साखळी फेरीत खेळलेल्या संघांविरुद्ध सामने न खेळता दुसऱ्या संघातील दोन संघांशी सामने खेळणार आहे. उदाहरणार्थ ए गटातील पहिला संघ डी गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या संघांविरुद्ध सामने खेळणार आहे.

सुपर 12 फेरीनंतर प्रत्येक गटातील प्रत्येकी 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरीत विजय मिळणारे संघ 4 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळतील. उपांत्य फेरीतील सामने 30 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला खेळले जाणार आहेत.

अशी आहे गटवारी

साखळी फेरीसाठी भारताचा ए गटात समावेश असून या गटात बांगलादेश, आयर्लंड आणि युएसए हे संघ आहेत. तसेच बी गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड हे चार संघ आहेत. सी गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे चार संघ आहेत. डी गटात अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ हे चार संघ आहेत.

भारताचे साखळी फेरीतील सामने 14 जानेवारी, 18 जानेवारी आणि 20 जानेवारी रोजी अनुक्रमे बांगलादेश, युएसए आणि आयर्लंड संघांविरुद्ध होणार आहेत. हे तिन्ही सामने आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT