ICC Ranking: कसोटी, टी20 असो वा वनडे...सर्वत्र भारताचेच वर्चस्व! रँकिंगमध्ये पहिला नंबर मिळवत रचला इतिहास

Team India: भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टी२० आणि कसोटीनंतर वनडेतही अव्वल क्रमांक मिळवत इतिहास रचला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India became number one ranked Team across all formats:

शुक्रवारी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीला झालेल्या पहिल्या वनडेत 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याबरोबरच भारताने वनडे क्रमवारीत अव्वल स्थानही काबीज केल्याने मोठा विक्रम नावावर झाला आहे.

या विजयानंतर भारताने वनडे क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकत 116 रेटिंग पॉइंट्ससह अव्वल क्रमांक मिळवला. तसेच भारतीय संघ यापूर्वीच आंतरराष्ट्रीय टी20 आणि कसोटी संघ क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान होता.

त्यामुळे भारताने एकाचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

एकाचवेळी पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारातील क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळणारा भारत केवळ दुसराच संघ ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम दक्षिण आफ्रिकेने ऑगस्ट 2012 मध्ये केला होता.

Team India
T20 World Cup 2024 स्पर्धेचे सामने 'या' तीन ठिकाणी खेळले जाणार; ICC कडून शिक्कामोर्तब

भारतीय संघ गेल्या अनेक दिवसांपासून कसोटी आणि टी20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावर होता. पण आता वनडेतही भारताने अव्वल क्रमांक पटकावला आहे. आता भारताला हा अव्वल क्रमांक टिकवून ठेवण्याचे आव्हान असणार आहे. कारण अद्याप ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील दोन सामने बाकी आहेत.

दरम्यान, भारतीय संघ वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहचल्याने पाकिस्तान 115 रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचे मात्र गुण कमी झाले असून ते आता 111 रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Team India
ODI Ranking: सिराज सुस्साट...! ऑस्ट्रेलियन दिग्गजाला पछाडत पुन्हा मिळवला 'नंबर वन'चा ताज

भारतीय संघाचा विजय

शुक्रवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 50 षटकात सर्वबाद 276 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली होती. तसेच जोश इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावा केल्या होत्या. तसेच भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर 277 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली, त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडने 71 धावा केल्या. या दोघांनी सलामीला 142 धावांची भागीदारी केली.

त्यांच्यानंतर केएल राहुल (58) आणि सूर्यकुमार यादव (50) यांनीही अर्धशतके केली. त्यामुळे भारताने 48.4 षटकातच 5 विकेट्स गमावत 281 धावा करत आव्हान पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com