Hyderabad FC  Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: ओगबेचेच्या हॅटट्रिकने हैदराबाद अव्वल

हैदराबाद एफसीने आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत सोमवारी भारदस्त विजय साकारला आणि गुणतक्त्यात अव्वल स्थानही मिळविले.

किशोर पेटकर

पणजी: नायजेरियन स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याच्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर हैदराबाद एफसीने आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत सोमवारी भारदस्त विजय साकारला आणि गुणतक्त्यात अव्वल स्थानही मिळविले. वास्को येथील टिळक मैदानावर त्यांनी ईस्ट बंगालचा 4-0 फरकाने धुव्वा उडविला. (Hyderabad beat East Bengal in the Indian Super League)

ओगबेचे याने सामन्यात केलेला दुसरा गोल यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील 200वा ठरला. या 37 वर्षीय आघाडीपटूने अनुक्रमे 21, 44 व 74व्या मिनिटास चेंडूला गोलनेटची दिशा दाखविली. याशिवाय 45+1व्या मिनिटास अनिकेत जाधव यानेही गोल केला. 85व्या मिनिटास ईस्ट बंगालला पेनल्टी फटका मिळाला, मात्र फ्रान्यो प्रसे याच्या फटक्याचा अचूक अंदाज बांधत हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने ‘क्लीन शीट’ राखली.

हैदराबादचा हा स्पर्धेतील 12 लढतीतील पाचवा विजय ठरला. त्यांचे 20 गुण झाले आहेत. केरळा ब्लास्टर्सचेही तेवढेच गुण आहेत. मात्र गोलसरासरीत हैदराबाद (+14) अव्वल ठरला, तर केरळा ब्लास्टर्स (+8) दुसऱ्या स्थानी गेला. मागील लढतीत एफसी गोवास नमवून स्पर्धेतील पहिला सामना जिंकलेल्या ईस्ट बंगालला सोमवारी अजिबात सूर गवसला नाही. 13 लढतीत त्यांना सहावा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे 9 गुणांसह अकराव्या क्रमांकावर घसरण झाली.

हैदराबादचे पूर्वार्धात तीन गोल

पूर्वार्धातील खेळात तीन गोल नोंदवून हैदराबादने सामन्याचा निकाल जवळपास निश्चित केला. नायजेरियन बार्थोलोम्यू ओगबेचे याच्या भन्नाट खेळासमोर ईस्ट बंगालचा बचाव साफ फिकी ठरला. पहिला गोल नोंदविताना ओगबेचे याने सौविक चक्रवर्ती याच्या कॉर्नरवर सुरेख हेडिंग साधले. चेंडू गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याच्या चुकीमुळे नेटमध्ये गेला. नंतर दुसऱ्या गोलच्या वेळेस ओगबेचे याने अप्रतिम ड्रिबलिंग छान प्रदर्शन केले. ईस्ट बंगालचा अनुभवी बचावपटू आदिल खान याला गुंगारा दिल्यानंतर या आघाडीपटूने समोर फक्त गोलरक्षक भट्टाचार्य असताना त्यालाही सहजगतीने चकवा दिला. नंतर पूर्वार्धातील भरपाई वेळेत अनिकेत जाधवचा वेगवान धाव ईस्ट बंगालला भारी ठरली. हितेश शर्माच्या असिस्टवर कोल्हापूरच्या अनिकेतने मोसमातील दुसरा, तर एकंदरीत चौथा आयएसएल गोल नोंदवून हैदराबादची आघाडी मजबूत केली.

मोसमातील तिसरी हॅटट्रिक

आयएसएल स्पर्धेच्या (Indian Super League) आठव्या मोसमात हॅटट्रिक नोंदविणारा हैदराबादचा बार्थोलोम्यू ओगबेचे तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी 14 डिसेंबरला वास्को येथे जमशेदपूरच्या ग्रेग स्टुअर्ट याने ओडिशाविरुद्ध, तर 27 डिसेंबरला फातोर्डा येथे नॉर्थईस्ट युनायटेडच्या देशॉर्न ब्राऊन मुंबई सिटीविरुद्ध हॅटट्रिक साधली होती.

ओगबेचे याचा गोलधडाका

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत बार्थोलोम्यू ओगबेचे आता दुसऱ्या स्थानी आहे. त्याने यंदा 11 सामन्यांत सर्वाधिक 12 गोल केले असून एकूण 68 आयएसएल सामन्यांत 47 गोलची नोंद केली आहे. स्पॅनिश आघाडीपटू फेरान कोरोमिनास याने 57 सामन्यांत 48 गोल नोंदविले आहेत. बंगळूर एफसीचा सुनील छेत्री यानेही 106 सामन्यांत 48 गोल केले आहेत. कोरो व छेत्री संयुक्त अव्वल आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT