Indian Super League: एफसी गोवाला मिळाली चुकांची शिक्षा

नवे प्रशिक्षक मारियो रिव्हेरा यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्ट बंगालने अखेर आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत पहिल्या विजयाची चव चाखली.
East Bengal
East BengalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सामन्याच्या पूर्वार्धात एफसी गोवाने टाळता येण्याजोग्या चुका केल्या, त्याला लाभ उठवत नवोदित नाओरेम महेश सिंग याने दोन गोल केले, त्यामुळे पराभवाची शिक्षा डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला भोगावी लागली. नवे प्रशिक्षक मारियो रिव्हेरा यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्ट बंगालने (East Bengal) अखेर आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत पहिल्या विजयाची चव चाखली.

बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर बुधवारी झालेल्या लढतीत तळात संघर्ष करणाऱ्या ईस्ट बंगालने एफसी गोवा (FC Goa) संघाला 2-1 फरकाने हरविले. सामन्यातील तिन्ही गोल पूर्वार्धातील खेळात झाले. आयएसएलमध्ये प्रथमच गोल नोंदविताना नाओरेम महेश सिंग याने अनुक्रमे 9 व्या व 42 व्या मिनिटास चेंडूला अचूक दिशा दाखविली. तोच सामन्याचा मानकरी ठरला. एफसी गोवासाठी स्पॅनिश मध्यरक्षक आल्बेर्टो नोगेरा याने 37 व्या मिनिटास गोल केला.

East Bengal
Indian Super League: ओडिशा एफसीने नॉर्थईस्ट युनायटेडचा उडविला धुव्वा

ईस्ट बंगालने स्पर्धेतील 12व्या सामन्यात पहिला विजय नोंदविला. त्यांचे आता 9 गुण झाले आहेत. यापूर्वी त्यांनी सहा बरोबरी व पाच पराभव अशी कामगिरी केली होती. ईस्ट बंगाल संघ आता नवव्या क्रमांकावर आला आहे. समान गुण झाल्यानंतर ईस्ट बंगालने (-8) गोलसरासरीत नॉर्थईस्ट युनायटेडला (-9) शेवटच्या अकराव्या क्रमांकावर ढकलले. मागील तीन सामने अपराजित असलेल्या एफसी गोवास स्पर्धेतील 12व्या लढतीत पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे 13 गुण, तसेच नववा क्रमांक कायम राहिला. एफसी गोवासाठी बचावफळीतील कमजोर खेळ पुन्हा एकदा डोकेदुखी ठरला. ईस्ट बंगालने पूर्वार्धात आघाडी मिळविल्यानंतर उत्तरार्धात बचावावर जास्त लक्ष केंद्रित करत एफसी गोवास आक्रमणासाठी मोकळीक दिली नाही.

East Bengal
Indian Super League: सुरक्षित वातावरणातच एफसी गोवा खेळणार

वर्चस्व, पण चुका नडल्या

सामन्याच्या पूर्वार्धात एफसी गोवा संघाने वर्चस्व राखले, पण त्यांनी चुका केल्या, त्याचा फटका त्यांना बसला, तर ईस्ट बंगालने आयत्या संधीचे सोने केले. पहिल्यांदा कर्णधार एदू बेदिया याची चेंडूवरील एकाग्रता भंगली. त्याच्या चुकीच्या पासिंगचा लाभ नाओरेम महेश सिंगने घेतला. या युवा खेळाडूने आयएसएलमधील पहिला गोल नोंदविताना बेदिया पासिंगमध्ये चुकल्यानंतर चेंडूवर ताबा घेत जोरदार मुसंडी मारली व गोलरक्षक धीरज सिंगला पूर्णपणे चकविले. विश्रांतीला तीन मिनिटे असताना बचावपटू अन्वर अली याची चूक ईस्ट बंगालला फायदेशीर ठरली.

यावेळी अन्वर आपल्या गोलरक्षकाकडे चेंडू मारण्याऐवजी भलत्याच दिशेने पासिंग केले. यावेळी नेटसमोरच असलेल्या महेशने चेंडूवर ताबा मिळवत ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली. ताकदवान फटक्यावर चेंडू गोलपट्टीच्या खालच्या भागास आपटून गोलरेषेआत गेला. आयएसएलमध्ये पहिलाच मोसम खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडूच्या नावे दोन गोल लागले. त्यापूर्वी 37 व्या मिनिटास होर्गे ओर्तिझच्या असिस्टवर आल्बेर्टो नोगेरा याने प्रेक्षणीय गोल करून एफसी गोवास बरोबरी साधून दिली होती. त्याचा हा यंदाच्या स्पर्धेतील तिसरा गोल, तर ओर्तिझचे चौथे असिस्ट ठरले.

एफसी गोवाविरुद्ध ईस्ट बंगाल प्रथमच विजयी

ईस्ट बंगालने आयएसएल स्पर्धेत एफसी गोवावर पहिलाच विजय नोंदविला. यापूर्वी गतमोसमात दोन्ही लढती गोलबरोबरीत राहिल्या होत्या. यंदा गेल्या 7 डिसेंबरला वास्को येथे एफसी गोवाने ईस्ट बंगालला 4-3 फरकाने हरविले होते. एकंदरीत 4 लढतीत एफसी गोवा व ईस्ट बंगालने प्रत्येकी 1 सामना जिंकला असून 2 बरोबरी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com