Goa Politics: 'त्या' वर्तणुकीची जबाबदारी आमदाराची कशी? सरदेसाईंनी माफी मागण्यास दिला नकार; कोळसा मुद्द्यावरुन काब्रालही आक्रमक

Goa Budget Session 2026: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे.
MLA Vijai Sardesai
MLA Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत घडलेल्या प्रकारावरुन विधानसभा सभापतींनी आमदार विजय सरदेसाई यांना 24 तासांच्या आत माफी मागण्याचे आदेश दिले होते. मात्र, आज (10 मार्च) सभागृहात सरदेसाई यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला.

गोव्यातील (Goa) जनतेचे प्रश्न मांडणे हे माझे कर्तव्य आहे आणि प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या व्यक्तींच्या वर्तणुकीवर आमदाराचे नियंत्रण असू शकत नाही, असे ठाम प्रतिपादन सरदेसाई यांनी केले. या वादासोबतच कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनीही कोळसा वाहतुकीच्या मुद्द्यावरुन काही नेत्यांवर निशाणा साधत सभागृहात वातावरण तापवले.

MLA Vijai Sardesai
Goa Politics: 'सरदेसाईंनी 24 तासांत माफी मागावी अन्यथा कारवाई'! सभापतींचा इशारा; 5 जणांच्या संकुल प्रवेशावर घातली बंदी

विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी सभागृहात आपली बाजू मांडताना सांगितले की, आमदार म्हणून आम्हाला लोकांना विधानसभेचे कामकाज पाहण्यासाठी पास देण्याचा अधिकार आहे. मात्र, पास घेऊन आत आलेल्या व्यक्तीने तिथे कसे वागावे, हे आमदाराच्या हातात नसते. विधानसभेत कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही, याचे सर्वस्वी अधिकार सभापतींकडे असतात.

जर भविष्यात पास घेतलेल्या व्यक्तींच्या वर्तणुकीची जबाबदारी आमदारांनीच घ्यावी, अशी अपेक्षा असेल, तर त्यासाठी सभागृहात सविस्तर चर्चा होऊन स्वतंत्र नियम किंवा कायदा बनवण्याची गरज आहे, असे सरदेसाई यांनी सुनावले. केवळ पास दिला म्हणून संबंधित व्यक्तीच्या कृत्यासाठी आमदाराने माफी मागावी, हा तर्क अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MLA Vijai Sardesai
Goa Politics: 'काँग्रेस पक्ष युतीचा धर्म पाळणार'! माणिकराव ठाकरेंचे प्रतिपादन; भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी घेणार निर्णय

दुसरीकडे, कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी कोळसा वाहतुकीच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर आणि काही बाहेरील नेत्यांवर जोरदार टीका केली. काही नेते स्वतःलाच गोव्याचे एकमेव रक्षक समजत असून माझ्या मतदारसंघात भीतीचे वातावरण पसरवत असल्याचा आरोप काब्राल यांनी केला. "कुडचडे मतदारसंघात कोळसा कधीच येणार नाही, हे मी स्पष्ट करु इच्छितो. काही नेते असे वागत आहेत जणू काही त्यांनाच गोव्याची काळजी आहे आणि आम्ही आमदार गोव्याच्या विरोधात आहोत," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

MLA Vijai Sardesai
Goa Politics: "होता तो गोवा सरकारने नष्ट केला, तिसरा जिल्हा केवळ कागदावर"! सरदेसाई कडाडले; आखाती युद्धाबाबत म्हणाले की.. Video

जर गोव्यातील इतर कोणत्याही गावात कोळसा येत असेल, तर तो थांबवण्याची विनंती मी स्वतः मुख्यमंत्र्यांना करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले. केवळ राजकीय फायद्यासाठी आमदारांना 'गोवा-विरोधी' ठरवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही काब्राल यांनी दिला. अधिवेशनातील या दोन मोठ्या घडामोडींमुळे गोव्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com