Harmanpreet Kaur  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: हरमनप्रीत कौरच्या नावावर नोंदवला गेला 'हा' लाजिरवाणा रेकॉर्ड!

INDw vs BANW: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

Manish Jadhav

INDw vs BANW: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. भारतीय महिला संघ आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.

ज्याचा दुसरा सामना आज खेळला गेला. टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरली, पण एकामागून एक विकेट पडत राहिल्या. यामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरच्या विकेटचाही समावेश होता. ती शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतली.

हरमनप्रीत कौरने शून्यावर आऊट होऊन विक्रम मोडला

भारतीय महिला संघाविषयी बोलायचे झाल्यास, स्मृती मानधनाच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड आहे, ती खाते न उघडता पाच वेळा बाद झाली होती. तितक्याच वेळा हरमनप्रीतही शून्यावर बाद झाली होती.

पण आता हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) बांगलादेशविरुद्ध शून्यावर आऊट झाल्यानंतर स्मृतीला मागे टाकले आहे, तिने आतापर्यंत सहा वेळा अशी कामगिरी केली आहे.

दुसरीकडे, त्यांच्यानंतरच्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, अनुजा रावत पाच वेळा, मिताली राज पाच वेळा आणि शफाली वर्माही पाच वेळा बाद झाली आहे. पण आता कर्णधार स्वतः पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली, पण त्यानंतर सातत्याने विकेट पडत गेल्या

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, कर्णधार हरमप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी डावाची सलामी दिली. या दोघींमध्ये 33 धावांची भागीदारी झाली, मात्र त्यानंतर सातत्याने विकेट पडल्या.

स्मृतीने 13 चेंडूत 13 आणि शफाली वर्माने (Shafali Verma) 14 चेंडूत 19 धावा केल्या. त्याचवेळी, हरमनप्रीत कौर पहिल्याच चेंडूवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये गेली. संघाची सुरुवात चांगली झाली, पण एकाही फलंदाजाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.

टीम इंडियाने सर्वात लहान धावसंख्या केली

भारतीय संघाने 20 षटकांअखेर आठ गडी बाद 95 धावा केल्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला संघाला 100 धावाही करता आल्या नाहीत. बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मधील ही सर्वात लहान धावसंख्या आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT