IND vs BAN: भारताच्या मुली चमकल्या, दुसरा T20 सामना जिंकून मालिकेवर केला कब्जा; शफालीचं ते अखेरचं षटक...

IND vs BAN: 3 सामन्यांच्या T20 मालिकेत टीम इंडियाने सलग दुसरा विजय नोंदवत मालिकाही ताब्यात घेतली आहे.
Shafali Verma
Shafali Verma Dainik Gomantak
Published on
Updated on

BAN W vs IND W: भारतीय महिला संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. ज्युनियर आणि सीनियर खेळाडूंनी सजलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा 8 धावांनी पराभव केला. 3 सामन्यांच्या T20 मालिकेत टीम इंडियाने सलग दुसरा विजय नोंदवत मालिकेवरही कब्जा केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघाने पहिला टी-20 सामना 7 विकेटने जिंकला होता.

दरम्यान, भारताने (India) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 8 गडी गमावून 95 धावा केल्या. 96 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 1 चेंडू शिल्लक असताना सर्वबाद झाला. शेवटच्या षटकात संघाला विजयासाठी 11 धावांची गरज होती, परंतु शफाली वर्माने अप्रतिम गोलंदाजी करताना केवळ 1 धाव दिली आणि त्या षटकात 4 बळी घेतले.

Shafali Verma
BAN vs IND, T20I: कॅप्टन हरमनप्रीतचे नाबाद अर्धशतक! भारतीय संघाचा बांगलादेशवर दणदणीत विजय

सामन्याची स्थिती

शफाली वर्माने (Shafali Verma) टीम इंडियासाठी सर्वात मोठी 19 धावांची खेळी खेळली. तिच्याशिवाय अमनजोत कौरने 14 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलतानाने 38 धावा केल्या, मात्र ती वेळेत बाद झाली. मिन्नू मणीने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी करत 4 षटकात 9 धावा देत 2 बळी घेतले.

Shafali Verma
BAN vs IND: टीम इंडियासाठीचं पदार्पण ठरलं ऐतिहासिक! 'या' खेळाडूच्या नावावर मैदानात पाऊल ठेवताच मोठा रेकॉर्ड

अखेरच्या षटकात 11 धावा हव्या होत्या

दुसरीकडे, अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी 11 धावांची गरज होती. कर्णधार हरमनप्रीत कौरने शफाली वर्माकडे चेंडू दिला. शफालीच्या गोलंदाजीने शेवटच्या षटकात रंगत आणली. 20व्या षटकात शफालीच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 8 धावांनी सामना जिंकला. शफालीने 14 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले, त्यानंतर 3 षटकात 15 धावा देऊन 3 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com