BAN vs IND, T20I: कॅप्टन हरमनप्रीतचे नाबाद अर्धशतक! भारतीय संघाचा बांगलादेशवर दणदणीत विजय

India vs Bangladesh: भारतीय महिला संघाने यजमान बांगलादेशला पहिल्या टी20मध्ये पराभवाचा धक्का दिला.
Harmanpreet Kaur
Harmanpreet KaurDainik Gomantak
Published on
Updated on

Bangladesh Women vs India Women, 1st T20I: भारतीय महिला संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून यजमानांविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. पहिल्या टी20 मालिकेत भारतीय महिला संघाने बांगलादेश महिला संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. यासह 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी माफक 115 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 16.2 षटकात 3 विकेट्स गमावत 118 धावा करत सहज पूर्ण केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला.

Harmanpreet Kaur
Team India Video: टीम इंडियाचा मनाचा मोठेपणा! वेस्ट इंडिजमधील स्थानिक खेळाडूंना सिराजकडूनही स्पेशल गिफ्ट

या सामन्यात भारताकडून सलामीला शफाली वर्मा आणि स्मृती मानधना उतरल्या होत्या. पण भारताला पहिला धक्का पहिल्याच षटकात बसला. शफलीला डावात तिसऱ्याच चेंडूवर मारुफा अक्तरने पायचीत बाद केले. शफलीला भोपळाची फोडता आला नाही. पण त्यानंतर जेमिमा रोड्रिग्सने स्मृतीला साथ देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती देखील 11 धावा करून माघारी परतली.

त्यानंतर मात्र, स्मृती आणि हरमनप्रीत यांची जोडी जमली. या दोघींनीही तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांनी भागीदारी रचली आणि भारतासाठी विजयाचा मार्ग सुकर केला. त्यांची भागीदारी 14 व्या षचकात सुलताना खातुनने तोडली. तिच्या गोलंदाजीवर स्मृतीला यष्टीरक्षक निगर सुलतानाने 38 धावांवर यष्टीचीत केले.

नंतर हरमनप्रीतने यास्तिका भाटियाला साथीला घेत तिचे अर्धशतक पूर्ण केले, तसेच भारताला विजय देखील मिळवून दिला. हरमनप्रीतने 35 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 54 धावांची नाबाद खेळी केली. तसेच यास्तिकाने नाबाद 9 धावा केल्या.

बांगलादेशकडून सुलताना खातुनने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मारुफा अक्तरने 1 विकेट घेतली.

Harmanpreet Kaur
BAN vs IND: टीम इंडियासाठीचं पदार्पण ठरलं ऐतिहासिक! 'या' खेळाडूच्या नावावर मैदानात पाऊल ठेवताच मोठा रेकॉर्ड

तत्पुर्वी, भारतीय कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बांगलादेश संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. बांगलादेशकडून साथी राणी आणि शमिमा सुलताना यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताकडून पदार्पण करणाऱ्या मिन्नू मणीने शमिमाला 17 धावांवर बाद करत बांगलादेशला पहिला धक्का दिला.

पण त्यानंतर साथीला शोभना मोस्तरीने साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र साथीच 22 धावावर पुजा वस्त्राकरकडून त्रिफळाचीत झाली. यानंतर कर्णधार निगर सुलताना 2 धावांवरच बाद झाली. खेळपट्टीवर स्थिरावलेली शाभनानेही 23 धावा केल्यानंतर विकेट गमावली.

अखेरीस शोरना अक्तर आणि रितू मोनी यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बांगलादेशला 100 धावांचा टप्पा पार करता आला. पण मोनी अखेरच्या षटकात 11 धावांवर बाद झाली. शोरना 28 धावांवर नाबाद राहिली. त्यामुळे बांगलादेशने 20 षटकात 5 बाद 114 धावा उभारल्या.

भारतीय गोलंदाजांनी विकेट्स घेण्याबरोबरच धावाही रोखल्या होत्या. त्यामुळे बांगलादेशला प्रतिषटक 6 धावांची धावगतीही ठेवता आली नाही. भारताकडून पुजा वस्त्राकर, मिन्नू मनी आणि शफली वर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

आता भारतीय महिला आणि बांगलादेश महिला संघातील टी20 मालिकेचा दुसरा सामना ढाकालाच 11 जुलै रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com