Hardik Pandya  Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya: हार्दिक गुजरात टायटन्समध्ये कायम! IPL 2024 लिलावापूर्वी 'या' खेळाडूंना केलं रिलीज

Gujarat Titans: गुजरात टायटन्सने आयपीएल 2024 स्पर्धेच्या लिलावापूर्वी कर्णधार हार्दिक पंड्याला संघात कायम केले आहे.

Pranali Kodre

Hardik Pandya retained by Gujarat Titans ahead of IPL 2024 Auction:

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान या हंगामाचा लिलाव होण्यापूर्वी 26 नोव्हेंबर सर्व फ्रँचायझींना संघात कायम केलेल्या खेळाडूंची आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अखेरची तारीख होती.

त्यानुसार आता गुजरात टायटन्स संघाने संघातून मुक्त केलेल्या आणि कायम केलेल्या खेळाडूंची नावेही समोर आली आहेत. दरम्यान, गुजरातचा आयपीएल 2022 विजेता कर्णधार हार्दिक पंड्याबद्दल बरीच चर्चा होती. पण त्याला गुजरातने आयपीएल 2024 साठी कायम केले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून चर्चा होती की हार्दिकला गुजरात मुंबई इंडियन्सकडे ट्रेड करणार आहे. मात्र आता गुजरातने त्याला संघात कायम केल्याने तो पुन्हा मुंबईकडे जाणार असल्याच्या अफवा असल्याचे म्हटले जात आहे.

पण याबरोबरच हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे की लिलावाच्या एक आठवडा आधीपर्यंत ट्रेडिंग विंडो ओपन असणार आहे. त्याचमुळे यानंतरही गुजरातकडे हार्दिकला मुंबईला ट्रेड करण्याची संधी असणार आहे. त्यामुळे आता हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे की हार्दिक लिलावापर्यंत गुजरातकडे कायम राहातो की त्याआधी पुन्हा मुंबईत परत जातो.

हार्दिकने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्सकडूनच केली होती. हार्दिकला मुंबई इंडियन्सने 2015 साली 10 लाखांच्या किंमतीत खरेदी केले होते. त्यावेळी तो अनकॅप खेळाडू होता. हार्दिकने मुंबईकडून 2015, 2017, 2019 आणि 2020 या आयपीएल हंगामांचे विजेतेपद जिंकले आहे.

हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून 2015 ते 2021 दरम्यान 92 सामन्यांमध्ये 1476 धावा केल्या. तसेच 51 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर हार्दिकला मुंबईने मुक्त केले होते.

यानंतर आयपीएल 2022 आधी गुजरातने हार्दिकला 15 कोटींमध्ये संघात कायम केले होते. त्यानंतर त्याने 2022 आणि 2023 मध्ये गुजरातचे नेतृत्वही केले. तसेच 2022 मध्ये संघाला विजेतेपदही मिळवून दिले होते, तर 2023 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात उपविजेते ठरले होते.

आयपीएल 2024 लिलावापूर्वी गुजरात टायटन्स संघातून मुक्त केलेले खेळाडू - यश दयाल, केएल भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदिव सांगवान, ओडेन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दसून शनका

संघात कायम केलेले खेळाडू - हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विलियम्सन, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवातिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटील, मोहित शर्मा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT