Hardik Pandya: 'माझ्यासाठी सत्य पचवणं...', वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यानंतर हार्दिकची आली पहिली प्रतिक्रिया

Team India World Cup: हार्दिक पंड्याने वर्ल्डकप 2023 मधून दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Hardik Pandya
Hardik Pandya

Hardik Pandya react on missing out from remainder of ICC ODI Cricket World Cup 2023 due to Injury:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता अखेरच्या टप्प्याकडे वळत असताना भारतीय क्रिकेट संघाला तगडा झटका बसला आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या उर्वरित वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून बाहेर झाला आहे. याबद्दल आता हार्दिकचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

त्याने वर्ल्डकपमधून बाहेर झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. त्याने म्हटले आहे की ही बातमी पचवणे कठीण आहे.

हार्दिकला या स्पर्धेदरम्यान खेळताना डाव्या पायाच्या घोटाला झालेल्या दुखापतीमुळे संघातून बाहेर व्हावे लागले आहे.

Hardik Pandya
IND vs SL: 'बेस्ट फिल्डर आहे...', खुद्द सचिन तेंडुलकरने केली घोषणा, 2003 ची खास आठवणही सांगितली

याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की 'मी उर्वरित वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला मुकणार आहे, हे सत्य पचवणे खूप कठीण आहे. मात्र, मी संघासोबत असेल, मी त्यांना प्रत्येक सामन्यात प्रत्येक चेंडूवर चिअर करत राहिल.'

'तुम्ही मला दिलेल्या शुभेच्छांबद्दल, प्रेमाबद्दल आभार, तुमचा पाठिंबा अतुलनीय आहे. हा संघ खास आहे आणि मला खात्री आहे आमचा सर्वांना अभिमान वाटेल.'

कशी झाली हार्दिकला दुखापत?

हार्दिकला वर्ल्डकप 2023 स्पर्धेतच 19 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पुण्याला झालेल्या सामन्यावेळी डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या सामन्यात त्याच्याच गोलंदाजीवेळी क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला.

त्यानंतर लगेचच त्याला बंगळुरूला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आले. मात्र, तो अद्याप या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे आता त्याला या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.

Hardik Pandya
World Cup 2023: 'ICC, टीम इंडिया आणि वेगळा बॉल!' पाकिस्तानी क्रिकेटरचा हस्यास्पद दावा अन् आकाश चोप्राची फटाकेबाजी

हार्दिकने या स्पर्धेत खेळलेल्या चार सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याला चार सामन्यात केवळ एकदाच फलंदाजीची संधी मिळाली आहे, ज्यात त्याने नाबाद 11 धावा केल्या होत्या.

हार्दिकचा बदली खेळाडू

दरम्यान, उर्वरित वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी हार्दिकचा बदली खेळाडू म्हणून प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज असलेल्या कृष्णाने आत्तापर्यंत 17 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. कृष्णाने वनडेत 29 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी20 क्रिकेटमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com