इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. हा आयपीएलचा 17 वा हंगाम आहे. दरम्यान, या हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच गतउपविजेत्या गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे.
गुजरात टायटन्सचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड हा आयपीएल 2024 हंगामातील सुरुवाचे एक किंवा दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्सला पहिला सामना 24 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध अहमदाबादला खेळायचा आहे.
तसेच दुसरा सामना 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळायचा आहे. पण याचकाळात वेड ऑस्ट्रेलियामधील देशांतर्गत स्पर्धा शेफिल्ड शिल्डच्या अंतिम सामन्यात टास्मानियाकडून खेळणार आहे.
टास्मानियाने अंतिम सामन्यात प्रवेश केला असून 2012-13 नंतर विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 21 ते 25 मार्चदरम्यान होणार आहे. दरम्यान, वेग गुजरातच्या दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध राहू शकतो, पण त्यासाठी त्याला ऑस्ट्रेलियावरून अंतिम सामन्यानंतर लगेचच भारतात यावे लागणार आहे.
याबद्दल टास्मानिया संघाचे प्रशिक्षक जेफ वॅगन यांनी माहिती दिली आहे की वेडने याबद्दल गुजरात टायटन्स फ्रँचायझीला कळवले आहे.
मॅथ्यू वेड गुजरात टायटन्ससाठी महत्त्वाचा खेळाडू राहिला असला, तरी गेल्या हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
शुभमन गिल (कर्णधार), केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, मोहम्मद शमी, आर साई किशोर, मोहित शर्मा, नूर अहमद, राशिद खान, जोशुआ लिटिल, उमेश यादव, अझमतुल्लाह ओमरझई, सुशांत मिश्रा, मानव सुतार, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉनसन, रॉबिन मिन्झ, शाहरुख खान.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.