Pat Cummins | Sunrisers Hyderabad Captain
Pat Cummins | Sunrisers Hyderabad CaptainX/ICC

IPL 2024: कमिन्सवर सनरायझर्स हैदराबादला गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी, विश्वविजेता कर्णधार सांभाळणार नेतृत्वाची धुरा

Sunrisers Hyderabad Captain: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 साठी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

SunRisers Hyderabad announced Pat Cummins as a Captain ahead of IPL 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या या 17 व्या हंगामापूर्वी सनरायझर्स हैदराबादने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. सनरायझर्स हैदराबादने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे आता नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.

आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार आणि एडेन मार्करमने केले होते. परंतु, गेल्यावर्षी हैदराबाद संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी राहिला होता.

हैदराबादला आयपीएलच्या 16 व्या हंगामात अवघे 4 सामनेच जिंकता आले होते. त्यानंतर हैदराबादने 17 व्या हंगामासाठी संघात बरेच बदल केले असून आता नेतृत्वातही मोठा बदल केला आहे.

Pat Cummins | Sunrisers Hyderabad Captain
IPL 2024 Promo Release: आयपीएलचे बिगुल वाजले! प्रोमो व्हिडिओमध्ये झळकले पंड्या, पंत, अय्यर आणि राहुल

कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या लिलावात 20.50 कोटी रुपयांची बोली लावल संघात घेतले आहे. तो आयपीएल लिलावात 20 कोटींची बोली लागलेला पहिलाच खेळाडू आहे. त्याच्यानंतर त्याचात साथीदार मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाईट रायडर्सने 24 कोटींहून अधिक पैसे मोजले.

दरम्यान, कमिन्सने गेल्या वर्षभरात त्याच्या नेतृत्वाने अनेकांना प्रभावित केले आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये टेस्ट चॅम्पियनशी स्पर्धा जिंकली. तसेच ऍशेस ट्रॉफीही राखण्यात यश मिळवले.

इतकेच नाही, तर 2023 मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेचेही विजेतेपद ऑस्ट्रेलियाने त्याच्या नेतृत्वाखाली जिंकले आहे.

Pat Cummins | Sunrisers Hyderabad Captain
IPL 2024: ऋतुराजबरोबर रचिन रविंद्र करणार CSK साठी सलामीला फलंदाजी? धोनीला घ्यावा लागणार मोठा निर्णय

कमिन्सला आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव देखील आहे. त्याने आयपीएलमध्ये 2015 मध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत 42 आयपीएल सामने खेळले असून 45 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 3 अर्धशतकांसह 379 धावा केल्या आहेत.

दरम्यान त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव असला, तरी त्याला टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा अनुभव नाही. त्याने ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे. परंतु, त्याने आत्तापर्यंत टी20 मध्ये कधीही नेतृत्व केलेलं नाही. त्यामुळे या प्रकारतही तो कसे नेतृत्व करतो हे पाहाणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com