Roosh Kalaria Dainik Gomantak
क्रीडा

Indian Cricketer Retirement: भारत-विंडीज मालिकेदरम्यानच 'या' ऑलराउंडरची निवृत्ती, भारताला बनवलेलं वर्ल्ड चॅम्पियन

जसप्रीत बुमराहचा खास मित्र असलेल्या भारताच्या 30 वर्षीय ऑलराउंडरने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Roosh Kalaria announced Retirement: एकिकडे भारताचा वरिष्ठ संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असतानाच दुसरीकडे भारताचा 30 वर्षांचा अष्टपैलू क्रिकेटपटू रोश कलारियाने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातकडून खेळणाऱ्या कलारियाने अचानकच निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याच्या पोस्ट खाली त्याचा चांगला मित्र असलेल्या जसप्रीत बुमराहनेही कमेंट केली आहे. त्याने लिहिले की 'माझ्या मित्रा शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.'

कलारिया 2012 साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. त्याने साल 2012 मध्येच गुजरातच्या वरिष्ठ संघाकडूनही पदार्पण केले होते. तो 2021 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भागही होता. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

Jasprit Bumrah Instagram Story

दरम्यान, तो गुजरातचा एक चांगला वेगवान गोलंदाज म्हणून देशांतर्गत क्रिकेटमध्ये ओळखला जात होता.

त्याने निवृत्तीची घोषणा करताना लिहिले आहे की 'हा निर्णय सांगताना संमिश्र भावना आहेत. मी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. हा शानदार प्रवास होता, ज्याच्या आठवणी मी नेहमी जपेल. बॅट आणि बॉल हातात घेऊन स्वप्न पाहाण्याऱ्या एका युवकापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत, या खेळाने मी कल्पाना केल्यापेक्षाही खूप काही दिले आहे.'

याशिवाय त्याने त्याच्या प्रशिक्षकांचे, संघसहकाऱ्यांचे, कुटुंबाचे, मित्रांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर तो म्हणाला, 'मी निवृत्त झाल्याने आता माझ्या आयुष्यातील नवा अध्याय सुरु करण्यास मी उत्सुक आहे. क्रिकेटची जागा माझ्या मनात खूप खास आहे. मी वेगळ्या क्षमतेने या खेळासाठी योगदान देणे सुरू ठेवेल.'

कालारिया 2018-19 मध्ये गुजरातचा रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही होता. त्याने 8 सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने त्यावेळी केरळविरुद्ध हॅट्रिकही घेतली होती. तो 2016-17 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या गुजरात संघाचाही भाग होता.

कलारियाने त्याच्या कारकिर्दीत 56 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 173 विकेट्स घेतल्या. तसेच 3 शतके आणि 5 अर्धशतकांसह 1764 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 49 लिस्ट ए सामन्यांमध्ये 67 विकेट्स घेतल्याअसून 285 धावा केल्या आहेत. तो 40 टी20 सामनेही खेळला असून यात त्याने 49 विकेट्स घेतल्या आहेत, तर 98 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

SCROLL FOR NEXT