Ishan Kishan on Rishabh Pant: 'मी त्याचा आभारी...' इशानने फक्त पंतची बॅटच वापरली नाही, तर बॅटिंगमध्येही झलक दाखवली

India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत इशान किशनने ऋषभ पंतचे नाव लिहिलेल्या बॅटने फटकेबाजी केली.
Ishan Kishan
Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

Ishan Kishan Uses Rishabh Pant’s Bat: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदादमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने ताबडतोड अर्धशतकी खेळी केली. पण त्याच्या अर्धशतकाबरोबरच त्याची बॅटही सध्या चर्चेत आहे. याला कारण ऋषभ पंत आहे.

इशान आणि पंत हे यष्टीरक्षक भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी एकमेकांचे स्पर्धक असले, तरी ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. 19 वर्षांखालील क्रिकेटपासून ते एकमेकांना ओळखत असून त्यांच्यात चांगले सामंजस्यही आहे. हेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान दिसून आले.

या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात इशानला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बढती देण्यात आली. त्याने या क्रमांकावर फलंदाजी करताना आक्रमक खेळ केला. दरम्यान, 30 धावांच्या आसपास असताना त्याने बॅट बदलली, त्यावेळी त्याच्या बॅटवर ऋषभ पंतच्या नावाची आद्याक्षरे आणि त्याचा जर्सी क्रमांक (RP17) लिहिलेला दिसत होता.

Ishan Kishan
Ishan Kishan Video: 'धोनीची जागा भरून काढायची,' ईशानची इच्छा, पहिल्या भेटीचीही सांगितली आठवण

इशानने या डावात पंतच्या नावाची बॅटच वापरली नाही, तर त्याच्याप्रमाणेच आक्रमक फटकेबाजी करताना 34 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 52 धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक झाल्यानंतर भारताने 2 बाद 181 धावांवर डाव घोषित करत पहिल्या डावातील 183 धावांच्या आघाडीच्या जोरावर वेस्ट इंडिजसमोर 365 धावांचे आव्हान ठेवले.

दरम्यान, चौथ्या दिवशी फलंदाजीनंतर इशानने पंतचे आभारही मानले. बीसीसीआयने याचा व्हिडिओ शेअर केला असून त्यात इशाने सांगत आहे की 'मी इथे येण्यापूर्वी एनसीएसमध्ये होते. मी तिथे सराव करत होतो आणि ऋषभ पंतही तिथे त्याच्या रिहॅबसाठी होती. त्यावेळी त्याने मला काही सल्ले दिले.'

'त्याने मला माझ्या फलंदाजी क्रमांकावबद्दल आणि बाकी गोष्टी विचारले. त्याने मला खेळताना पाहिले आहे. आम्ही एकत्र खूप सामने खेळले आहेत. आम्ही 19 वर्षाखालील क्रिकेटपासून एकत्र खेळत आहोत.'

'त्यामुळे त्याला मी कसा खेळतो माहित आहे, माझी मानसिकता माहित आहे. त्यामुळे त्याने मला माझ्या फलंदाजी क्रमांकाबद्दल आणि बाकी गोष्टींबद्दल सांगून मदत केली. मला कोणीतरी माझ्या फलंदाजीबद्दल सल्ला द्यावा असे वाटत असते आणि त्याने माझ्याकडे येऊन चर्चा केल्याबद्दल मी त्याचा आभारी आहे.'

Ishan Kishan
IND vs WI, 2nd Test: विंडिजची कडवी झुंज, पण सामन्यात भारताचे वर्चस्व; अखेरचा दिवस ठरणार निर्णायक

इशानने सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील डॉमिनिकाला झालेल्या पहिल्या कसोटीतून पदार्पण केले होते. पण त्याला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नव्हती. त्याने एक धाव केल्यानंतर भारताने पहिला डाव घोषित केला होता. हा सामना भारताने १ डाव आणि १४१ धावांनी जिंकला होता.

दरम्यान, सध्या त्रिनिदादमध्ये सुरु असेलल्या दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकात 2 बाद 76 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून तेजनारायण चंद्रपॉल 24 धावांवर आणि जर्मेन ब्लॅकवूड 20 धावांवर नाबाद खेळत आहेत.

वेस्ट इंडिजला अखेरच्या दिवशी विजयासाठी अद्याप 289 धावांची गरज आहे, तर भारताला 8 विकेट्सची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com