Bhuvneshwar Kumar Dainik Gomantak
क्रीडा

Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारला मिळाली खूशखबर, आशिया कपमध्ये कुणी विचारलंही नाही!

Bhuvneshwar Kumar: यंदाच्या आशिया कपसाठी टीम इंडियात स्थान न मिळालेल्या भुवनेश्वर कुमारबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Bhuvneshwar Kumar: यंदाच्या आशिया कपसाठी टीम इंडियात स्थान न मिळालेल्या भुवनेश्वर कुमारबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

गतवर्षी T20 मध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या कुमारला CEAT क्रिकेट रेटिंग अंतर्गत 'T20 Bowler of the Year' हा किताब देण्यात आला आहे.

भुवनेश्वर कुमारला मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही सहभागी झाला होता.

CEAT लिमिटेडद्वारे पुरस्कार प्रदान

दरम्यान, CEAT लिमिटेड ने CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कार 2023 चे आयोजन मुंबईत केले होते. यामध्ये भारताच्या महिला आणि पुरुष खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाद्वारे खेळाडूंना जून 2022 ते मे 2023 या कालावधीतील कामगिरीच्या आधारे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिची 'CEAT महिला क्रिकेटर ऑफ द इयर' म्हणून निवड झाली आहे, तर युवा फलंदाज शुभमन गिलला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्कार 2023 देण्यात आला आहे.

भुवीने फोटो शेअर केले आहेत

भुवनेश्वरने या पुरस्कारासोबतचे त्याचे दोन फोटो त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत तो पुरस्कार घेतलेला दिसत आहे तर दुसऱ्या फोटोत बी कुमार अवॉर्ड शोमध्ये हसताना दिसत आहेत.

आशिया कपसाठी टीम इंडियात संधी मिळाले नाही

दरम्यान, सध्या बी कुमार टीम इंडियातून बाहेर आहे. आशिया चषक 2023 साठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा त्याला कोणी विचारलेही नाही. विशेष म्हणजे, त्याच्या नावाची फारशी चर्चाही झाली नाही.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांना आशिया कपमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी कुमारने 37 विकेट घेतल्या होत्या

अचूक लाईन-लेन्थ आणि स्विंग बॉलिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या भुवनेश्वरने गेल्या वर्षी 32 टी-20 सामन्यांमध्ये 19.56 च्या सरासरीने 37 बळी घेतले होते. भुवीने 4 धावांत 5 बळी अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. गेल्या वर्षी 32 टी-20 सामन्यांमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 6.98 होता.

भुवनेश्वर कुमारची कामगिरी

भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) टीम इंडियासाठी 21 टेस्ट मॅचमध्ये 63 विकेट घेतल्या आहेत. 121 एकदिवसीय सामन्यात 141 तर 87 टी-20 सामन्यात 90. त्याने शेवटचा सामना नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

SCROLL FOR NEXT