Student Visa Fraud: मुलीला कॅनडात शिकवण्याचे स्वप्न पडले महागात; व्हिसाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

Canada Student Visa Fraud in Goa: उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली.
Canada Student Visa Fraud in Goa
Student Visa FraudDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: कॅनडात उच्च शिक्षणासाठी स्टुडंट व्हिसा मिळवून देण्याच्या आमिषाने आल्त-पर्वरी येथील एका महिलेची सुमारे ९ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्नाटकातील संशयिताला पर्वरी पोलिसांनी अखेर अटक केली आहे. बी. पी. मणिकांता (३७, रा. मंगळुरू, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिलेच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी कॅनडाला पाठवण्यासाठी संशयिताने स्टुडंट व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्याने व्हिसाच्या नावाखाली त्या महिलेकडून विविध यूपीआय आणि एनईएफटी व्यवहारांद्वारे स्वतःच्या कुटुंबीयांच्या तसेच परिचितांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ९,६८,४७० रुपये वर्ग करून घेतले. मात्र, पैसे उकळल्यानंतर संशयिताने व्हिसा मिळवून दिला नाही आणि घेतलेले पैसेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Canada Student Visa Fraud in Goa
Goa Screenwriters Lab: महिलांच्या कथांना मिळणार चित्रपटाचे रूप; गोव्यात ‘स्क्रिनरायटर्स लॅब’ सुरू होणार

या तक्रारीच्या आधारे पर्वरी पोलिसांनी १० फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१६(२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होता आणि पोलिसांना चकवा देत होता. त्याला शोधण्यासाठी यापूर्वी बंगळुरू आणि मंगळुरू येथे पोलिस पथके पाठवूनही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.

दरम्यान, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयिताच्या डिजिटल फूटप्रिंट्सचा सखोल अभ्यास करून तो मंगळुरू येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार उपनिरीक्षक सचिन शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कॉन्स्टेबल नितेश गावडे आणि झाहिद शेख यांचे विशेष पथक तयार करून २३ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळुरूला रवाना करण्यात आले.

Canada Student Visa Fraud in Goa
Goa Politics: प्रत्येक कुटुंबाला दरमहा 15 हजारांचा लाभ! सत्तेत येताच मोफत वीज देण्याचे 'आप'चे आश्वासन

स्थानिक मंगळुरू पोलिसांच्या मदतीने तसेच तांत्रिक पाळत आणि गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून संशयित मणिकांता याला मंगळुरू येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला पर्वरी पोलिस ठाण्यात आणून २६ नोव्हेंबर २०२६ रोजी रीतसर अटक करण्यात आली. न्यायालयाने संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पर्वरी पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.