ST Reservation: आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकार सरसावले; 7 डिसेंबरपासून सुनावणी, केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

Goa ST Reservation Act 2025 latest news: ‘गोवा अनुसूचित जमाती आरक्षण (रिअ‍ॅडजस्टमेंट) कायदा, २०२५’ हा पूर्णपणे संवैधानिक असून, तो संसदेच्या कायदेविषयक अधिकारक्षेत्रातच येतो, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात मांडली आहे.

पणजी: ‘गोवा अनुसूचित जमाती आरक्षण (रिअ‍ॅडजस्टमेंट) कायदा, २०२५’ हा पूर्णपणे संवैधानिक असून, तो संसदेच्या कायदेविषयक अधिकारक्षेत्रातच येतो, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात मांडली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची अंतिम सुनावणी उच्च न्यायालयात ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. आगामी निवडणुकीपूर्वी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी लवकरात लवकर निकाल देण्याची विनंती राज्य सरकार न्यायालयाला करणार असून, उद्या राज्य सरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे.

गोव्यातील अनुसूचित जमाती समाजाला आरक्षणाचा लाभ देणाऱ्या २०२५ च्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकारने आपले उत्तर दाखल केले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या घडामोडींची माहिती देताना महाधिवक्ता देविदास पांगम यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाचा आदेश अंतरिम स्वरूपाचा असल्याने आणि मुख्य प्रकरणावर सुनावणी होणार असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

महाधिवक्ता देविदास पांगम यांनी सांगितले की, यापूर्वी पक्षकार नसलेल्या गोवा राज्याला तसेच एसटी समाजातील एका संघटनेला या प्रकरणात पक्षकार म्हणून समाविष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.