Bhuvneshwar Kumar: भारताचा 'स्विंग किंग' घेणार निवृत्ती? भुवीच्या 'त्या' कृतीमुळे चर्चेला जोरदार उधाण

Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमार लवकरच निवृत्ती घेऊ शकतो, अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे.
Bhuvneshwar Kumar
Bhuvneshwar KumarDainik Gomantak
Published on
Updated on

Bhuvneshwar Kumar retirement speculations: भारताचा स्विंग किंग म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार अचानक चर्चेत आला आहे. पण या मागे त्याची मैदानावरील कामगिरी नाही, तर सोशल मीडिया हे कारण आहे. सध्या त्याच्या निवृत्तीच्या शक्यतांच्या चर्चांना उधाण आले आहे.

भुवनेश्वर कुमारच्या इंस्टाग्राम बायोचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते भुवनेश्वरच्या जुन्या आणि नवीन इंस्टाग्राम बायोचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

या स्क्रिनशॉटनुसार भुवनेश्वरच्या जुन्या इंस्टाग्राम बायोमध्ये भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) असे लिहिले होते. तसेच नवीन इंस्टाग्राम बायोमध्ये क्रिकेटपटू हा शब्द काढून टाकलेला आहे आणि फक्त भारतीय असा शब्द ठेवला आहे.

Bhuvneshwar Kumar
WI vs IND, 1st ODI: 'माझ्या पदार्पणावेळी...', रोहितने 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचं सांगितलं खरं कारण

हे स्क्रिनशॉट व्हायरल होत असल्याने भुवनेश्वर लवकरच निवृत्ती घेऊ शकतो, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. निवृत्तीच्या निर्णयामुळे त्याने त्याच्या इंस्टाग्राम बायोमधील क्रिकेटपटू हा शब्द काढून टाकल्याचा अंदाज काही चाहत्यांनी लावला आहे.

भुवनेश्वर कुमारने भारताकडून अखेरीस नोव्हेंबर 2022 मध्ये न्युझीलंडविरुद्धच्या टी20 सामन्यात खेळला आहे. त्यानंतर तो भारतीय संघात पुनरागमन करू शकलेला नाही. सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात देखील त्याचा समावेश नाही.

तसेच तो आयपीएल 2023 नंतर देखील कोणताही स्पर्धात्म सामना खेळलेला नाही.

Bhuvneshwar Kumar
IND vs WI 1st ODI: इशान-कुलदीपच्या जोरावर टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर पाच विकेट्सने विजय!

उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा भुवनेश्वर कुमार 21 कसोटी सामने खेळला असून 63 विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याने 4 वेळा एका डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तसेच त्याने 3 अर्धशतकांसह 552 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर त्याने 121 वनडे सामने खेळले असून 141 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फलंदाजी करताना एका अर्धशतकासह 552 धावा केल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने 87 आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून 90 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com