

पणजी: गोव्याची प्रतिभाशाली युवा बॅडमिंटनपटू अमायरा धुमटकर हिने स्पृहणीय कामगिरी साधताना पाचव्या मिनी (११ वर्षांखालील) राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या मुलींच्या एकेरीत अंतिम फेरी गाठली. ती आता विजेतेपदापासून फक्त एक विजय दूर आहे.
स्पर्धेत अव्वल मानांकन असलेल्या अमायरा हिने उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या रिषा कडियन हिच्यावर १५-१३, १५-१३ अशी सरळ दोन गेममध्ये मात केली. छत्तीसगडमधील रायपूर येथे स्पर्धा सुरू आहे. अमायराने उपांत्यपूर्व फेरीत राजस्थानच्या राशी सिंघल हिचा १५-६, १५-४ असा पराभव केला होता.
गतवर्षी पटकावले ब्राँझ
सलग दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ११ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत उपांत्य फेरी गाठणारी अमायरा गोव्याची पहिली खेळाडू ठरली आहे. गेल्या वर्षी गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिने ब्राँझपदकाची कमाई केली होती.
सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय पदक
यंदा अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे अमायराने सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय पदक जिंकण्याची किमया साधली आहे. अंतिम लढतीत तिचे लक्ष्य सुवर्णपदकावर असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.