Goa University Inter college weightlifting championship 2023  Dainik Gomantak
क्रीडा

Goa University Championship: डॉन बॉस्को अभियांत्रिकी उपविजेते, भास्कर गैनला ‘लोहपुरुष’ किताब

फातोर्ड्याचे डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय स्पर्धेत उपविजेते ठरले.

किशोर पेटकर

Goa University Inter college weightlifting championship 2023

आसगाव-बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या (डीएम्स) महाविद्यालयाने गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष वेटलिफ्टिंग स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्पर्धा ताळगाव पठारावरील विद्यापीठाच्या ज्युबिली हॉलमध्ये झाली.

फातोर्ड्याचे डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय स्पर्धेत उपविजेते ठरले, तर या महाविद्यालयाचा भास्कर गैन ‘लोहपुरुष’ किताबाचा मानकरी ठरला. त्याने ८१ किलो वजनगटात स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये मिळून एकूण २३५ किलो वजन उचलला. मडगावच्या श्री दामोदर महाविद्यालयास तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे संयुक्त सचिव जयेश नाईक, डीएम्स महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक सुशांत हळदणकर, गोवा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा साहाय्यक संचालक भालचंद्र जदार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

स्पर्धेतील विजेते

५५ किलो वजनगट: ॲल्टन आल्मेदा (१४८ किलो, श्री दामोदर महाविद्यालय), ६१ किलो वजनगट: रजत गडेकर (१५३ किलो, डीएम्स महाविद्यालय), ६७ किलो वजनगट: ध्रुव नाईक (१३८ किलो, गोवा अभियांत्रिकी-फर्मागुढी), ७३ किलो वजनगट: ॲलिस्टर गोम्स (१७० किलो, डॉन बॉस्को अभियांत्रिकी)

८१ किलो वजनगट: भास्कर गैन (२३५ किलो, डॉन बॉस्को अभियांत्रिकी), ८९ किलो वजनगट: संजीव रेवोडकर (१५३ किलो, डीएम्स), ९६ किलो वजनगट: क्रेसन गोन्साल्विस (१९९ किलो, डॉन बॉस्को-पणजी), १०२ किलो वजनगट: आर्यन सातार्डेकर (१६१ किलो, डीएम्स), १०९ वरील किलो वजनगट: यश गाड (१५९ किलो, डीएम्स).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT