<div class="paragraphs"><p>Goa Cricket</p></div>

Goa Cricket

 

Dainik gomantak

क्रीडा

गोव्याला डावाने पराभवाची सवय, हिमाचलची विजयासह सात गुणांची कमाई

दैनिक गोमन्तक

पणजी : कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट (Cricket) स्पर्धेत डावाने पराभूत होण्याची गोव्याची सवय सलग तिसऱ्या लढतीत कायम राहिली. हिमाचलने त्यांना गुरुवारी सकाळी डाव व 114 धावांच्या फरकाने हरवून सात गुणांची कमी केली. एलिट क गट चार दिवसीय सामना सूरत येथील खोलवड जिमखाना मैदानावर झाला.

गोव्याच्या (goa) संघाची 419 धावांच्या पिछाडीनंतर सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर 8 बाद 292 अशी स्थिती होती. गुरुवारी सकाळी 7.2 षटकांत 13 धावांची भर टाकून गोव्याचा दुसरा डाव 305 धावांत संपुष्टात आला. दीप कसवणकर 15, तर लखमेश पावणे 4 धावांवर बाद झाला.

हिमाचलच्या रितिक कुमार याने दुसऱ्या डावात 136 धावांत 8 गडी बाद केले. पहिल्या डावात त्याने 54 धावांत 6 बळी घेतले होते. एकूण 14 गडी बाद करणारा रितिक हिमाचलच्या स्पर्धेतील पहिल्या विजयाचा शिल्पकार ठरला. गोव्याने पहिल्या डावात 153 धावा केल्यानंतर हिमाचलने पहिला डाव 7 बाद 572 धावांवर घोषित केला होता.

गोव्याला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राकडून दोन दिवसांत डाव व 64 धावांनी हार स्वीकारावी लागली होती. नंतर तमिळनाडूने त्यांच्यावर डाव व 49 धावांनी विजय नोंदविला. सलग तीन सामन्यांत मोठ्या फरकाने पराभूत झालेला गोव्याचा संघ गटात शून्य गुणासह शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यांचा पुढील सामना 20 डिसेंबरपासून छत्तीसगडविरुद्ध सूरत येथे खेळला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT