कुचबिहार करंडक स्पर्धेत आर्यन नार्वेकरचे दमदार 'शतक'

आर्यन नार्वेकर (Aryan Narvekar) याने प्रतिकुल परिस्थितीत झळकावलेले तडफदार शतक दिलासा देणारे ठरले.
Aryan Narvekar

Aryan Narvekar

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पणजी: कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा (Goa) संघ हिमाचलविरुद्ध पराभूत होणार हे निश्चित आहे, पण आर्यन नार्वेकर (Aryan Narvekar) याने प्रतिकुल परिस्थितीत झळकावलेले तडफदार शतक दिलासा देणारे ठरले. त्याने शैलीदार 123 धावा करताना अर्धशतकवीर उदित यादव (Udit Yadav) याच्यासमवेत संघर्षपूर्ण शतकी भागीदारी करून पराभव लांबविला.

सूरत येथील खोलवड जिमखाना स्टेडियमवर सुरू असलेल्या एलिट क गट लढतीत पहिल्या डावात 153 धावा केलेल्या गोव्याने दुसऱ्या डावात बुधवारी तिसऱ्या दिवसअखेर 8 बाद 292 धावा केल्या. ते अजूनही 127 धावांनी पिछाडीवर आहेत. डावाने विजय नोंदविण्यासाठी हिमाचलला आणखी दोन विकेटची गरज आहे. सामन्याचा गुरूवारी शेवटचा दिवस आहे. हिमाचलने कालच्या 5 बाद 550 वरून पहिला डाव सकाळच्या सत्रात 7 बाद 572 धावांवर घोषित केला. त्यांना एकूण 419 धावांची आघाडी मिळाली. हिमाचलच्या रितिक कुमार याने दुसऱ्या डावातही अफलातून मारा केला. पहिल्या डावात 54 धावांत 6 गडी टिपलेल्या रितिकने दुसऱ्या डावातही 6 विकेट मिळवताना 132 धावा मोजल्या.

<div class="paragraphs"><p>Aryan Narvekar</p></div>
कुचबिहार करंडक स्पर्धेत हिमाचलचा गोव्यावर 'हल्लाबोल'

दुसऱ्या डावात गोव्याची 5 बाद 128 अशी बिकट स्थिती असताना आर्यनने उदितसह खिंड लढविली. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या आर्यनने निर्धाराने फलंदाजी करताना अगोदरचे अपयश धुवून काढले. सलग दुसऱ्या डावात अर्धशतक केलेल्या उदितने त्याला तोलामाची साथ दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. उदितने अगोदरच्या डावात 67 धावा केल्या होत्या. बुधवारी त्याने 116 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. तो रितिकचा सहावा बळी ठरला. उदितचे या स्पर्धेतील हे तिसरे अर्धशतक ठरले. दिवसातील 2.1` षटकांचा खेळ बाकी असताना आर्यनची झुंजार खेळी संपुष्टात आली. त्याने 269 चेंडूंचा सामना करताना 19 चौकार व 2 षटकार मारले. मृदूल सुरोच याने त्याला त्रिफळाचीत बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः १५३ व दुसरा डाव ः ९४ षटकांत ८ बाद २९२ (इझान शेख १९, देवनकुमार चित्तेम १४, आर्यन नार्वेकर १२३, मनीष काकोडे ०, आयुष वेर्लेकर १९, कौशल हट्टंगडी ८, उदित यादव ७९, शिवेंद्र भुजबळ २१, दीप कसवणकर नाबाद ६, लखमेश पावणे नाबाद ०, रितिक कुमार ४३-७-१३२-६, मृदूल सुरोच १६-२-६३-२) वि. हिमाचल ः पहिला डाव ः ७ बाद ५७२ घोषित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com