बुद्धिबळातील तिरकी चाल Dainik Gomantak
क्रीडा

Goa: बुद्धिबळातील तिरकी चाल

गोवा (Goa) बुद्धिबळ संघटनेची आगामी निवडणूक ठरल्यानुसार होण्याबाबत संभ्रम आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा (Goa) बुद्धिबळ संघटनेची (Chess Association) आगामी निवडणूक ठरल्यानुसार होण्याबाबत संभ्रम आहे. ही निवडणूक महिनाअखेरीस नियोजित आहे. निवडणुकीतील (Election) काही संभाव्य उमेदवारांच्या माहितीनुसार सध्या सत्तारुढ असलेला गट निवडणूक पुढे ढकलण्याच्या मनःस्थिती आहे. कारण त्यांच्यापाशी निवडून येण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. (Goa Chess Association is confused about upcoming election)

मोर्चेबांधणी करण्यासाठी व काही तालुका संघटनांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी आणखी वेळ मिळावा यासाठी सध्याचा सत्तारूढ गट तालुका प्रतिनिधींना चुचकारत असल्याची माहिती आहे. प्रलोभने दाखविण्यासाठी सरकारपक्षातील काही जण वावरत असल्याचेही समजते. बुद्धिबळात जिंकण्यासाठी ही तिरकी चाल असल्याचे विरोधकांचे मानणे आहे. या संदर्भात अजून कोणी उघडपणे दंड थोपटलेले नाही, मात्र लवकरच तशी शक्यता आहे.

दरम्यान महेश कांदोळकर (Mahesh Kandolkar) यांच्या `टूगेदर फॉर चेस' या गटाने तिसवाडी (Tiswadi) तालुका बुद्धिबळ (Chess) संघटनेच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व राखले. स्वतः कांदोळकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडीत हॅटट्रिक साधली, तर अन्य आठ जागांवरही त्यांच्या गटातील उमेदवार विजय मिळवला आहे.

सालसेत (Salset) तालुका बुद्धिबळ असोसिएशनची (Chess Association) नुतन कार्यकारिणी निवडण्यासाठी मडगावच्या बीपीएस क्लब सभागृहात निवडणुक पार पडली होती. त्या निवडणुकीत असोसिएशनच्या 56 पैकी 55 सभासदांनी भाग घेतला होता. आशेश केणी (Ashesh Keni) यांची अध्यक्षपदी (president) तर सुनील बाळ्ळीकर याची सचिवपदी निवड झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवाडी ते पणजी फेरीसेवा

Indian Navy Goa: भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा आणि मच्छीमार नौकेचा अपघात कसा झाला? महत्वाची माहिती समोर, दोघेजण अद्याप बेपत्ताच

IFFI 2024: 'पौराणिक कथा मिथक नाहीत, ती तर आपली संस्कृती'; ‘महावतार नरसिंह’च्या दिग्दर्शकाने जागवला परंपरांचा अभिमान

Goa Mining: पिळगाव शेतकऱ्यांचे आंदोलन, दिवस सहावा; खनिज वाहतूक व्यवसायाला मोठा फटका, 173 ट्रक खाताहेत धूळ

Saint Francis Xavier Exposition: गोंयचो सायब पावलो!! पाकिस्तानी भाविकांचा गोव्यात येण्याचा मार्ग मोकळा; व्हिसा मंजूर

SCROLL FOR NEXT