गोवा बुद्धिबळ निवडणूक लांबणीवर

नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे संघटनेचे सचिव किशोर बांदेकर (Kishore Bandekar) यांनी सोमवारी संध्याकाळी सांगितले.
Goa Chess Association
Goa Chess AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा बुद्धिबळ संघटनेशी (Goa Chess Association) संलग्न दोन तालुका संघटनांच्या निवडणुका लांबल्यामुळे आता राज्य संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीची निवडणूकही पुढे ढकलावी लागत आहे. नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे संघटनेचे सचिव किशोर बांदेकर (Kishore Bandekar) यांनी सोमवारी संध्याकाळी सांगितले.

गोवा बुद्धिबळ संघटनेची निवडणूक येत्या 30 जुलै रोजी नियोजित होती, पण तालुका प्रतिनिधींची नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे निवडणूक लांबणीवर टाकावी लागत आहे. सध्या बाराही तालुका प्रतिनिधी नोंदणीचे काम पूर्णत्वाकडे आहे. सर्व तालुक्यांचे दस्तऐवज तपासल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिरोडकर मतदार यादी जाहीर करतील, असे बांदेकर यांनी नमूद केले.

Goa Chess Association
बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णीची भारतीय संघात निवड

गोवा बुद्धिबळ संघटनेशी 12 तालुका संघटना संलग्न आहेत. त्यापैकी नऊ तालुक्यातील संघटना बिनविरोध ठरल्या, तर पेडणे तालुका संघटनेची नवी कार्यकारिणी 27 जून रोजी निवडून आली. त्याच दिवशी तिसवाडी व सासष्टी तालुका संघटनेची निवडणूक नियोजित होती, पण राज्यातील कोविड-19 निर्बंधामुळे दोन्ही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची निवडणुकीसाठी परवानगी मिळाली नाही. त्यामुळे या दोन्ही संघटनेची निवडणूक पुढे ढकलावी लागली होती.

Goa Chess Association
Goa: टॉप 10 गोमंतकीय फुटबॉलपटू

नंतर तिसवाडी आणि सासष्टी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कोविड-19 मार्गदर्शक शिष्टाचारानुसार निवडणूक घेण्यास परवानगी दिल्यानंतर या दोन्ही ठिकाणी चार जुलै रोजी निवडणूक झाली व नवी व्यवस्थापकीय समिती निवडून आली. दोन तालुका संघटनेची निवडणूक लांबल्यामुळे मतदार यादी प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्याचा परिणाम राज्य संघटनेच्या निवडणुकीवर झाला हे आता स्पष्ट झाले आहे.

Goa Chess Association
ऐतिहासिक यशाचा आनंद अवर्णनीय : भक्ती कुलकर्णी

निवडणुकीत चुरस अपेक्षित

वीजमंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आहेत. प्राप्त माहितीनुसार, आणखी एका मुदतीसाठी त्यांनी अध्यक्षपदी राहावे यासाठी प्रयत्न होत आहेत, तसे झाल्यास सध्याचे सचिव किशोर बांदेकरही आणखी एक मुदतीसाठी संघटनेत राहू शकतात. यावेळी आपण खजिनदारपदासाठी इच्छुक असल्याचे मागे बांदेकर यांनी जाहीर केले होते. मात्र यावेळी विरोध अपेक्षित आहे. उत्तर गोव्यातील तालुका संघटना एकवटल्या असून व्यवस्थापकीय समितीत महत्त्वाच्या पदासाठी उत्तर गोव्यातील संघटनांनी आग्रह धरला आहे, त्यासंदर्भात तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे महेश कांदोळकर यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे विचार मांडले होते. गोवा बुद्धिबळ संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीच्या आगामी निवडणुकीत दोन गट उभे ठाकल्यास जोरदार चुरस अपेक्षित असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com