शरेंन्द्र नाईक Dainik Gomantak
क्रीडा

Goa Chess Association election: सर्व मतभेद विसरुन बुद्धिबळाच्या उत्कर्षासाठी झटुया

22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (Meeting) त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल असेही नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: गोवा बुद्धिबळ (Goa Chess Organization) संघटनेमध्ये कसलेही मतभेद नाहीत. सर्वच सदस्य बुद्धिबळाच्या (Chess) विकासासाठीच (Chess development) काम करीत आहेत. केवळ निवडणुकांपुरते (Elections) काही गैरसमज झाले असेल, तरी सर्व गैरसमज दूर करुया, जे मतभेद झाले ते विसरुया व एकत्रितपणे राज्यातील बुद्धिबळाच्या (Chess) उत्कर्षासाठी झटुया असे आवाहन नवनिर्वाचीत सचिव शरेन्द्र नाईक (Sharendra Naik) यांनी या प्रतिनिधिशी बातचीत केली.

आमची कार्यकारी समिती (Executive Committee) बिनविरोध निवडून आली आहे. त्यामुळे 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल असेही नाईक यांनी सांगितले. कदाचीत कोणी कायद्याचा दरवाजा ठोठावलाच तर आमच्या निवडीला कसलाही धोका नाही. कारण निवडणुकीचे निर्वाचन अधिकारी सुभाष शिरोडकर व सहाय्यक निर्वाचन अधिकारी कुमार विष्णु महंत यांनी असोसिएशनच्या घटनेतील कलमांचा अभ्यास करुनच निर्णय घेतला असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले. शिवाय या कार्यकारिणीत सर्व बाराही तालक्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे ही समाधानाची बाब असल्याचे नाईक म्हणाले.

कुठल्याही राज्य क्रिडा संघटनेचा सचिव होणे हे एक मोठे आव्हान व जबाबदारी असते. सचिवाला सर्वांनाच बरोबर घेउन असोसिएशनचे कार्य पुढे न्यावे लागते. असोसिएशनचे कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करावे लागतात असेही एक कुशल संघटक, आयोजक म्हणुन प्रसिद्ध असलेल्या नाईक याने सांगितले. शरेन्द्र नाईक हे माशे काणकोण येथील आंगले उच्चमाध्यमिकाचे  शारिरिक शिक्षणाचे निवृत्त शिक्षक आहेत. शिवाय काणकोण क्रिडा व सांस्कृतिक क्लबचे सचिव व दक्षिण गोवा अॅथलेटीक्स असोसिएशनचे कार्यकारी समिती सदस्य आहे. गेल्या 20 वर्षांच्या काळात नाईक यांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली अॅथलेटिक्स, आर्चरी, टग ऑफ वॉर, बेसबॉल, टेबल टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन या खेळातील अनेक स्पर्घा काणकोण व दक्षिण गोव्यात झाल्या. काणकोणमध्ये अॅथलेटिक्स स्पर्धा सलग 12 वर्षे व महिला क्रिडा महोत्सव सलग दहा वर्षे त्यांनी आयोजित करुन दाखविला आहे. गोव्यात बुद्धिबळ हा खेळ जास्त शहरी भागात आहे. या खेळाचा प्रसार तळागळात व ग्रामिण भागात करण्यावर आपला भर असेल. शिवाय ग्रामिण भागांमध्ये बुद्धिबळाची प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा अधिक प्रमाणात आयोजित करण्याचा आपला मनोदय असल्याचेही त्याने सांगितले.

वीज मंत्री निलेश काब्राल यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीने गोव्यात दोन ग्रॅंडमास्टर्स स्पर्धा आयोजित केल्या. या स्पर्धा चालुच ठेवणे  व आशीश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली चेस इन स्कूल या बुद्धिबळ महासंघाच्या योजने अंतर्गत गोव्यातील सर्व शाळांमध्ये बुद्धिबळ पोहोचविणे व सर्व शालेय शिक्षकांना बुद्धिबळ खेळात प्रशिक्षीत करण्यावर आपला जास्त भर असेल असेही नाईक यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय स्तरावरील निवड स्पर्धाही गोव्यात आयोजित करण्याचा आपला मानस असल्याचे त्याने स्पष्ट केले. राज्यातील उच्च मानांकन असलेल्या बुद्धिबळपटूंना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यावरही आपला भर असेल असे नाईक यांनी सांगितले. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हे 2013 ते 2017 या कालावधीत बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांना संघटनेची व कार्याची पुर्ण माहिती असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा संघटनेची सर्वोच्च प्रगती निश्र्चितच साधली जाईल असे शरेन्द्र नाईक यांनी शेवटी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT