कोलवाळ आरोपी विवस्त्र प्रकरण: तुरुंगरक्षक विलास नाईक निलंबित

कोलवाळ तुरुंगातील अधिकारी अडचणीत, कैद्यांची कारागृहात दहशत
कोलवाळ तुरुंग
कोलवाळ तुरुंगDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कोलवाळ कारागृहात (Colvale Jail) आरोपींना विवस्त्र करून चित्रीकरण (Video) केल्याप्रकरणी मानवी हक्काचे उल्लंघन होते. या घटनेप्रकरणी तुरुंगरक्षक विलास नाईक (Prison guard Vilas Naik) याला निलंबित करण्यात आले आहे. कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून येत्या 8 दिवसांत चौकशीचा अहवाल देण्याचा निर्देश तुरुंग अधीक्षकांना देण्यात आला असल्याची माहिती महानिरीक्षक वेनान्सिओ फुर्तादो यांनी दिली. (Colvale Jail officials in trouble ​inmates terrorized in jail)

विवस्त्र करून कारागृहातील कक्षात चित्रीकरण करण्यात आलेले आरोपी कोलवा येथे अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आहेत. त्यांची पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. त्यामुळे चौघांची रवानगी गेल्या शुक्रवारी (६ ऑगस्ट) कोलवाळ कारागृहात करण्यात आली होती. त्यातील एकाला कोरोना झाल्याने त्याला वेगळ्या कक्षात ठेवले गेले होते, तर इतर तिघांना अलगीकरणात ठेवण्यात आले होते.

कोलवाळ तुरुंग
कोलवाळ तुरुंगातील कारनामे; आरोपींना विवस्त्रावस्थेत उठाबशा काढण्याची शिक्षा

मोबाईल आत आला कसा?

विवस्त्रावस्थेत जे चित्रीकरण करण्यात आले त्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल आतमध्ये कसा पोहचला तसेच तो तुरुंगरक्षकाने दिला होता का, याचाही शोध अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घेण्यात येत आहे.

अधिकारी अडचणीत

आरोपींना विवस्त्र करून त्यांना उठाबशा काढण्यास लावून त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याने तुरुंग महनिरीक्षक खात्यातील अधिकारी अडचणीत आले आहेत. कायद्यानुसार ही कृती मानवी हक्काचे उल्लंघन करणारी आहे. हा व्हिडीओ कोणी काढला व तो व्हायरल कसा झाला याचाही शोध घेण्यात येत आहे. काही कैदी तसेच तुरुंगातील कर्मचाऱ्यांवर संशय असून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे असे या सूत्राने सांगितले. त्यावेळी या कक्षात त्यांचे विवस्त्रावस्थेत चित्रीकरण केले गेले असे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. तुरुंगरक्षक विलास नाईक हा त्यावेळी ड्युटीवर होता. हे चित्रीकरण तेथे असलेल्या कैद्यांनीच केले असल्याचे पुढे आले असले तरी नावे उघड झालेली नाहीत. आज दिवसभरात अनेक कैद्यांच्या जबान्या नोंदविण्यात आल्या.

कोलवाळ तुरुंग
Goa Rape Case: आसामी युवतीवर बलात्कार प्रकरणी 21 ऑगस्टला सुनावणी

कैद्यांची कारागृहात दहशत

कारागृहात आलेल्या नव्या आरोपींना अश्‍लिल वागणूक आतमध्ये असलेल्या कैद्यांकडून मिळते. जोपर्यंत या घटनेचा व्‍हिडिओ व्हायरल होत नाही तोपर्यंत सर्व काही चिडीचूप असते. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कट्टर कैद्यांचे कारागृहात वर्चस्व असते. नव्या आरोपींना ते सांगतील कामे करावी लागतात. त्यांच्या या दहशतीमुळे नवख्या आरोपींसमोर पर्याय नसतो. तुरुंग रक्षकांचाही अप्रत्यक्षपणे त्याला पाठिंबा असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com