Footballer dies after struck by lightning 
क्रीडा

Viral Video: क्रीडा विश्व हळहळलं! अंगावर वीज पडल्याने फुटबॉलरने गमावला जीव

Footballer dies after struck by lightning: अंगावर वीज पडल्याने एका फुटबॉलरला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

Pranali Kodre

Football Player dies after struck by lightning in Indonesia during a match

क्रीडा जगताला हादरवणारी एक घटना इंडोनेशियामध्ये घडली आहे. अंगावर वीज पडल्याने एका खेळाडूला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सध्या क्रीडा जगतातून हळहळ व्यक्त होत आहे.

इंडोनेशियाच्या पीआरएफएमने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी इंडोनेशियाच्या वेस्ट जावामधील सिलिवांगी स्टेडियमवर एफसी बॅनडुंग आणि एबीआय शुंबेंग या क्लब संघात मैत्रीपूर्ण सामना खेळवला जात होता.

याच सामन्यादरम्यान 35 वर्षीय सेप्टन राहराजा या खेळाडूच्या अंगावर वीज पडण्याची धक्कादायक घटना घडली.

दरम्यान, खेळाडूच्या अंगावर वीज पडल्यानंतरच्या घटनेनंतरही त्याचा श्वासोच्छवास सुरू होता. मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्याने प्राण सोडले. या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसते की खेळाडूच्या अंगावर वरून वीज पडल्यानंतर तो जमीनीवर कोसळला. यावेळी बाकी खेळाडू घाबरून लांब झाले होते. पण लगेचच त्याला खाली पडलेले पाहून बाकी खेळाडू त्याच्याकडे धावत गेले.

या घटनेनंतर लगेचच मेडिकल टीमने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हालवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापूर्वीच त्याने आपले प्राण सोडले.

दरम्यान, खेळाडूच्या अंगावर वीज पडण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी इंडोनेशियामध्येच गेल्यावर्षी 13 वर्षांखालील एका फुटबॉल स्पर्धेदरम्यान एका खेळाडूवर वीज पडली होती.

त्यावेळी त्या खेळाडूला तातडीने हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले होते आणि त्यावर उपचार करण्यात आळा होता. तसेट साओ हेन्रिक या 21 वर्षीय खेळाडूवरही पराना येथे खेळत असताना त्याच्यावर वीज पडली होती. त्यानंतर त्याचाही मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT