

Punjabi Family Funny Video: आजच्या काळात सोशल मीडिया हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वी फोन उघडून फेसबुक, इंस्टाग्राम किंवा एक्सवर काय चालले आहे, हे पाहिल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. आपण तासनतास मोबाईलवर घालवतो आणि तिथे आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ भावूक करणारे असतात, तर काही आपल्याला खळखळून हसवतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्या घरातील किंवा नातेवाईकांमधील प्रसंगांची नक्कीच आठवण येईल.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक पुरुष आणि तीन महिला दिसत आहेत. सुरुवातीला तो पुरुष तिथून पुढे निघून जातो, त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या महिलांमध्ये (Women) एक जोराची जुंपलेली दिसते. पहिल्यांदा पाहताना असे वाटते की त्यांच्यात काहीतरी गंभीर कारणावरुन भांडण सुरु आहे, पण बारकाईने पाहिल्यावर सत्य समोर येते. हे कोणतेही कौटुंबिक भांडण नसून पाहुण्यांना दिली जाणारी ओवाळणी किंवा आहेर घेण्या आणि न घेण्यावरुन सुरु असलेली एक मजेशीर ओढाताण आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, घराची मालकीण पाहुण्या म्हणून आलेल्या महिलेला प्रेमाने आहेर देऊ इच्छिते, मात्र पाहुणी महिला तो घेण्यास स्पष्ट नकार देत आहे. दोघांमधील ही ओढाताण इतकी वाढते की त्या एकमेकींशी भांडत असल्याचा भास होतो. त्यानंतर ज्या महिलेला आहेर दिला गेला होता, तो आपल्या पतीकडे सोपवते आणि ते पैसे पुन्हा त्या घरच्या मोठ्या महिलेला परत करण्यासाठी सांगते. मग तो पुरुष आणि ती वृद्ध महिला यांच्यात पुन्हा एकदा आहेर स्वीकारण्यावरुन जुंपते. हा सर्व प्रकार भारतीय आणि विशेषतः पंजाबी संस्कृतीतील पाहुणचाराचा एक अविभाज्य भाग आहे, जिथे पाहुणे पैसे घेण्यास नकार देतात आणि घरचे लोक ते जबरदस्तीने खिशात घालण्याचा प्रयत्न करतात.
हा मजेशीर व्हिडिओ 'एक्स'वर @Panjaab131313 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. या व्हिडिओला दिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यावर लिहिले की, "हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर आहेर घेण्या आणि न घेण्यावरुन तणातणी सुरु आहे. प्रत्येक पंजाबी व्यक्ती स्वतःला या गोष्टीशी रिलेट करु शकते." हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून हजारो लोकांनी तो पाहिला असून कमेंट सेक्शनमध्ये हसण्याचे इमोजी आणि मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेकांनी म्हटले की, त्यांच्या घरी सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात असेच 'युद्ध' पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या (Social Media) जगात हा व्हिडिओ सध्या आनंदाचा आणि हास्याचा डोस ठरत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.