Kelvin Kiptum: क्रीडा जगतात शोककळा! अवघ्या 24 व्या वर्षी मॅरेथॉनमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या धावपटूचे अपघाती निधन

Kelvin Kiptum died in Accident: मॅरेथॉनमध्ये वर्ल्डरेकॉर्ड करणाऱ्या स्टार धावपटूने अवघ्या 24 व्या वर्षी कार अपघातात जीव गमावल्याने क्रीडा जगतात हळहळ व्यक्त होत आहे.
Kelvin Kiptum | Marathon Runner
Kelvin Kiptum | Marathon RunnerAFP

Marathon World Record Holder Kenya's Kelvin Kiptum died in road accident:

क्रीडा जगताला धक्का देणारी बातमी रविवारी (11 फेब्रुवारी) समोर आली. उदयोन्मुख धावपटू केल्विन किप्टम याचे रविवारी एका कार अपघातात निधन झाले. तो केवळ 24 वर्षांचा होता.

अपघात झालेल्या कारमध्ये केनियाच्या किप्टनबरोबर त्याचे प्रशिक्षक ग्रेविस हाकिझिमाना आणि केनियाचाच एक धावपटू देखील होता. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

त्यांचा अपघात केनियातील एल्डोरेट-केप्टागेट रस्त्यावर झाला. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्रातच शोककळा पसरली आहे.

Kelvin Kiptum | Marathon Runner
Cooch Behar Trophy: 46 चौकार, 3 षटकार अन् 404 धावा...! मुंबईविरुद्ध मॅरेथॉन खेळी करत प्रखरने घडवला इतिहास

किप्टमच्या नावावर पुरुष मॅरेथॉनमधील विश्वविक्रमही होता. त्याचे नाव मॅरेथॉन शर्यतीत गेल्या दोन वर्षांत सातत्याने झळकत होते. त्याच्या कामगिरीमुळे सातत्याने त्याचे नाव चर्चेत होते.

त्याने डिसेंबर 2022 मध्ये वेलेन्सियामध्ये फुल मॅरेथॉन पहिल्यांदा धावताना अवघी 2 तास 1 मिनिट आणि 53 सेकंद इतकी वेळ नोंदवत अनेकांना प्रभावित केले होते.

त्यानंतर वर्षभरातच त्याने शिकागोला तिसरी मॅरेथॉन स्पर्धा पळताना नवा विश्वविक्रम नोंदवला होता. त्याने 42 किलोमीटरचे अंतर अवघ्या 2 तास आणि 35 सेंकदात पूर्ण करत केनियाच्याच एल्युड किपचोगेचा विश्वविक्रम मोडला होता.

Kelvin Kiptum | Marathon Runner
Goa River Marathon: गोवा रिव्हर मॅरेथॉन डिसेंबरमध्ये; रविवारी जागृतीनिमित्त वेर्णा येथे ‘प्रोमो रन’

विशेष म्हणजे एल्युड आणि किप्टम हे दोघेही यावर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरले होते. तसेच या दोघांकडूनही अनेकंना पदकांची अपेक्षा होती. मात्र, त्यापूर्वीच किम्पनने जीव गमावल्याने सध्या सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

किप्टमने वयाच्या 13 व्या वर्षी धावण्यास सुरुवात केली. तो स्थानिक मॅरेथॉन स्पर्धेत धावायचा. त्यानंतर त्याने एल्डोरेटमध्ये पहिल्यांदा हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर 2018 मध्ये तो ही स्पर्धा जिंकला देखील.

त्याने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले. त्याने सुरुवातीला हाफ मॅरेथॉन शर्यतीत सहभाग घेतला होता. त्यानंतर त्याने फुल मॅरेथॉनवर त्याचे लक्ष्य केंद्रित केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com