Dattajirao Gaekwad: भारताच्या सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे निधन, BCCI नेही व्यक्त केला शोक

Dattajirao Gaekwad passed away: बीसीसीआयने मंगळवारी भारताच्या सर्वात वयस्कर क्रिकेटपटूचे निधन झाल्याची माहिती देत शोक व्यक्त केला.
Dattajirao Gaekwad
Dattajirao GaekwadX/BCCI

Dattajirao Gaekwad, India's oldest Test cricketer passed away:

भारताचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू दत्ताजीराव कृष्णाराव गायकवाड यांचे मंगळवारी (13 फेब्रुवारी) निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांनी गुजरातमधील बडोदा येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

बडोद्यातील राजघराण्यात वाढलेल्या दत्ताजीराव गायकवाड यांनी माजी क्रिकेटपटू सीके नायुडू यांचे भाऊ सीएस नायुडू यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवले होते. त्यांनी बडोद्याचे नेतृत्व करताना पहिल्याच वर्षी 1957-58 मध्ये रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते.

गायकवाड यांनी खेळाडू म्हणून कारकिर्द घडवल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण आणि क्रिकेट प्रशासनातही त्यांचे योगदान दिले होते.

Dattajirao Gaekwad
IND vs ENG: तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियात मोठा बदल; प्रमुख फलंदाज संघाबाहेर, तर 23 वर्षीय खेळाडूला संधी

त्यांच्या निधनाबद्दल बीसीसीआयने देखील शोक व्यक्त केला आहे. बीसीसीआयने लिहिले की 'दत्ताजीराव गायकवाड यांच्या निधनाबद्दल बीसीसीआय दु:ख व्यक्त करत आहे. ते भारताचे माजी कर्णधार आणि भारताचे सर्वात वयस्कर कसोटीपटू होते. त्यांनी ११ कसोटी सामने खेळले आणि 1959 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यात भारताचे नेतृत्वही केले.'

'त्यांच्या नेतृत्वाखाली बडोद्याने 1957-58 च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सर्विसेसचा पराभव करत विजेतेपदही जिंकले. बीसीसीआय गायकवाड यांच्या कुटुंबाच्या, मित्रपरिवाराच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात सामील आहे.'

दत्ताजीराव गायकवाड यांनी 1952 साली लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यांनी अखेरचा सामना 1961 मध्ये पाकिस्तानविरुद्ध चेन्नईमध्ये खेळला. त्यांनी 11 कसोटी सामने खेळताना 350 धावा केल्या.

तसेच त्यांनी 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यात नेतृत्व केले होते. पण त्यांच्या नेतृत्वात संघाला फार यश मिळाले नाही. परंतु फलंदाजीत त्यांनी चांगली कामगिरी केली. या दौऱ्यात त्यांनी 1174 धावा केल्या होत्या.

Dattajirao Gaekwad
Kelvin Kiptum: क्रीडा जगतात शोककळा! अवघ्या 24 व्या वर्षी मॅरेथॉनमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या धावपटूचे अपघाती निधन

दत्ताजीराव गायकवाड 1947 ते 1961 दरम्यान बडोद्यासाठी क्रिकेट खेळले. त्यांनी बडोदयासाठी 47.56 च्या सरासरीने 14 शतकासह 3139 धावा केल्या आहेत. त्यांनी 1959-60 च्या हंगामात महाराष्ट्र विरुद्ध त्यांची सर्वोच्च 249 धावांची खेळी केली होती.

साल 2016 मध्ये माजी क्रिकेटपटू दीपक शोधन यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाल्यानंतर दत्ताजीराव गायकवाड भारताचे सर्वात वयस्कर खेळाडू ठरले होते.

दत्ताजीराव गायकवाड यांच्यानंतर त्यांचा मुलगा अंशुमन गायकवाड व नातू शत्रुंजय गायकवाड यांनीही क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली. अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी 40 कसोटी आणि 15 वनडे सामने खेळले. ते प्रशिक्षण क्षेत्रातही कार्यरत होते. तसेच शत्रुंजय गायकवाड यांना भारताचे प्रतिनिधित्व करता आले नाही. मात्र ते बडोद्याकडून क्रिकेट खेळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com