England Team Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup साठी इंग्लंडचा संघ जाहीर; जोफ्रा आर्चर, जेसन रॉय यांना डच्चू

दैनिक गोमन्तक

T20 World Cup: ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आगामी ICC पुरुष T20 विश्वचषक 2022 साठी इंग्लंडने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये मात्र वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात स्थान मिळाले नाही. दुखापतीमुळे तो बराच काळ संघाबाहेर आहे. आपल्या राष्ट्रीय संघात आणि 'द हंड्रेड' मध्ये खराब कामगिरी करणारा जेसन रॉय 15 जणांच्या संघाचा भाग नाही. इंग्लंडने फिल सॉल्टची निवड केली आहे, ज्याने या वर्षाच्या सुरुवातीला T20 पदार्पण केले होते. 2021 मध्ये UAE मध्ये T20 विश्वचषक झाल्यापासून, रॉय 11 T20 मध्ये खेळला असून 206 धावा केल्या आहेत.

दरम्यान, सॉल्टची निवड हे सध्याच्या 'द हंड्रेड' या स्पर्धेतील त्याच्या मजबूत फॉर्मचे बक्षीस आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये 44.71 च्या सरासरीने 313 धावा केल्या आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर प्रथमच जागतिक स्पर्धेत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. इऑन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार बनवण्यात आले.

दुसरीकडे, दुखापतीमुळे बटलर आगामी पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यातून बाहेर पडला आहे. इंग्लंडच्या (England) पाकिस्तान दौऱ्यासाठी मोईन अलीच्या जागी त्याची निवड होईल, जिथे ते सात सामन्यांची T20 मालिका खेळेल. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात बटलर पुन्हा तंदुरुस्त होईल, असा विश्वास इंग्लंडला आहे.

तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) इंग्लंडच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत शानदार कामगिरी केल्यानंतर डेव्हिड मलाननेही पुनरागमन केले. यावर्षी T20 मध्ये मलानचा 148.27 चा स्ट्राइक रेट आहे. संघात तो मॉर्गनची जागा घेईल. मलानने 'द हंड्रेड' मध्ये सर्वाधिक 358 धावा करणारा फलंदाज ठरला. ECB ने पुष्टी केली की, वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि ख्रिस वोक्स आपापल्या दुखापतीतून सावरले आहेत. त्यांना 15 जणांच्या विश्वचषक संघात स्थान देण्यात आले आहे.

शिवाय, गेल्या वर्षीची टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup) कामगिरी विसरुन जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य संघाचे असेल. इंग्लंड 22 ऑक्टोबर 2022 रोजी पर्थमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान दौऱ्यासाठी इंग्लंडने 19 जणांचा संघ निवडला आहे, ज्यात पाच अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. जॉर्डन कॉक्स, टॉम हेल्म, विल जॅक, ऑली स्टोन आणि ल्यूक वुड यांना संधी मिळाली आहे.

T20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघ:

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

ट्रॅव्हल रिझर्व्ह: टायमल मिल्स, लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लेसन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ:

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.

ट्रॅव्हल रिझर्व्ह: टायमल मिल्स, लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लेसन

पाकिस्तान T20 साठी संघ:

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली (उपकर्णधार), हॅरी ब्रूक, जॉर्डन कॉक्स, सॅम कुरन, बेन डकेट, लियाम डॉसन, रिचर्ड ग्लेसन, टॉम हेल्म, विल, जॅक, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, ऑली स्टोन , रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, ल्यूक वुड आणि मार्क वुड.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT