T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, डेव्हिड वॉर्नरचा समावेश

Cricket Australia: ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वचषक सुरू होण्याच्या दीड महिन्यापूर्वी आपला संघ जाहीर केला आहे.
T20 World Cup 2022
T20 World Cup 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. संघाची धुरा आरोन फिंचकडे (Aaron Finch) सोपवण्यात आली आहे. गेल्या वेळीही फिंच ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होता. येथे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सिंगापूरचा फलंदाज टिम डेव्हिडचाही आपल्या संघात समावेश केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय T20 संघात जवळपास सर्वच चेहरे आहेत. जे गेल्या वर्षी T20 विश्वचषक खेळले होते. फक्त मिचेल स्वेप्सनच्या जागी टीम डेव्हिडची निवड करण्यात आली आहे. 26 वर्षीय टीम डेव्हिड हा टी-20 स्पेशालिस्ट क्रिकेटर मानला जातो. त्याने जगभरातील T20 फ्रँचायझी क्रिकेटमध्ये आपला करिष्मा दाखवला आहे. तो आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून खेळतो.

T20 World Cup 2022
Ind vs Hk Asia Cup: भारताचा हाँगकाँगवर 40 धावांनी विजय, सुपर 4 मध्ये एन्ट्री

T20 विश्वचषकापर्यंत ऑस्ट्रेलिया आता या संघासोबत क्रिकेटचा (Cricket) सर्वात लहान फॉरमॅट खेळताना दिसणार आहे. सप्टेंबरमध्ये, ती भारताच्या (India) दौऱ्यावर जाईल. जिथे तीन सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे. यानंतर ती इंग्लंड( England) , वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात टी-20 मालिकाही खेळणार आहे. टी-20 विश्‍वचषक ऑस्‍ट्रेलियामध्‍येच आयोजित केला जाणार असुन 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

ऑस्ट्रेलिया टिममधील खेळाडू: अॅरॉन फिंच (कर्णधार), अॅश्टन अगार, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com