रिकी पाँटिगची भविष्यवाणी, T20 World Cup 2022 मध्ये हे दोन संघ येणार आमने-सामने

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने दोन संघांच्या नावांचा खुलासा केला आहे.
Team India & Australia
Team India & AustraliaDainik Gomantak
Published on
Updated on

T20 World Cup 2022: दोन वेळा विश्वचषक जिंकणारा कर्णधार रिकी पाँटिंगने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाबाबत भाकीत केले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉंन्टिगने दोन संघांच्या नावांचा खुलासा केला आहे. ज्यावर त्याला विश्वास आहे की, ते यावेळी 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतील. अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन संघांपैकी कोणता संघ विजेतेपद पटकावणार हेही त्याने सांगितले आहे.

दरम्यान, आयसीसी रिव्ह्यूमध्ये संजना गणेशनला दिलेल्या मुलाखतीत पॉंन्टिगने सांगितले की, 'भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोनच संघ 2022 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचतील.' तो पुढे म्हणाला की, 'या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आपल्याकडे असणारे विजेतेपद राखून ठेवण्यात यशस्वी होईल. गेल्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करुन विजेतेपद पटकावले होते.'

Team India & Australia
T20 World Cup 2022: भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने; ICC ने निश्चित केली तारीख

तसेच, पॉंन्टिग पुढे म्हणाला की, “मला वाटते की भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत आमने सामने येतील. मला एवढेच सांगायचे आहे की, ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत भारताचा पराभव करेल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com