Sai Sudharsan Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: भारतावर 'साई'कृपा! सुदर्शनने ठोकले शानदार शतक, पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव

Manish Jadhav

Emerging Asia Cup 2023: एसीसी मेन्स इमर्जिंग आशिया कप 2023 मध्ये भारत A ने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 206 धावांचे लक्ष्य 36.4 षटकात 2 गडी गमावून सहज पार केले.

भारताकडून सलामीवीर साई सुदर्शन आणि वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगारगेकरने चमकदार कामगिरी केली. सुदर्शनने शानदार शतक ठोकले. त्याने 110 चेंडूत नाबाद 104 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. हंगारगेकरने 8 षटकांत 42 धावा देत 5 बळी घेतले.

साई सुदर्शनने तूफानी खेळी खेळली

दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. सुदर्शन आणि अभिषेक शर्मा (20) यांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. 12 व्या षटकात अभिषेकला मुबासिर खानने बाद केले.

सुदर्शनने दुसऱ्या विकेटसाठी निकिन जोस (53) सोबत 99 धावांची भागीदारी केली. मात्र, जोसला 31व्या षटकात मेहरान मुमताजने यष्टिचित केले. येथून सुदर्शन आणि कर्णधार यश धुल (नाबाद 20) यांनी आघाडी घेतली.

दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 53 धावांची शानदार भागीदारी केली. सुदर्शनने षटकार ठोकत भारताला (India) विजय मिळवून दिला. भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा (Pakistan) संघ 48 षटकांत 205 धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून कासिम अक्रम (48) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 63 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार मारले. सलामीवीर साहिबजादा फरहानने 35 धावा केल्या.

टेल बॅट्समन मुबासिर खानने 28 आणि मेहरान मुमताजने 25 धावांचे योगदान दिले. मुमताज नाबाद राहिला. हा ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना होता. भारत 50 षटकांच्या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे.

सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना 21 जुलै रोजी बांगलादेशशी होणार आहे. दुसरीकडे, त्याच दिवशी पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना 23 जुलै रोजी कोलंबो येथे होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT