Emerging Asia Cup 2023: भारताकडून नेपाळचा 9 गडी राखून पराभव, 'या' दिवशी भिडणार IND-PAK

Emerging Asia Cup 2023: इमर्जिंग आशिया कप अंतर्गत सोमवारी श्रीलंकेतील प्रेमदासा स्टेडियमवर भारत-नेपाळ यांच्यात सामना झाला.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Emerging Asia Cup 2023: इमर्जिंग आशिया कप अंतर्गत सोमवारी श्रीलंकेतील प्रेमदासा स्टेडियमवर भारत-नेपाळ यांच्यात सामना झाला. टीम इंडियाने नेपाळवर 9 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी नेपाळला 39.2 षटकांत 167 धावांत गुंडाळले.

निशांत सिंधूने शानदार गोलंदाजी करत 3.2 षटकात 14 धावा देत 4 बळी घेतले. तर राजवर्धन हंगरगेकरने 6 षटकात 25 धावा देत 3 बळी घेतले. हर्षित राणाने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करत 5 षटकात 16 धावा देत 2 बळी घेतले. मानव सुथारने एक विकेट घेतली.

साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा यांची शानदार खेळी

दरम्यान, नेपाळला 167 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियासाठी (Team India) सलामीला आलेल्या साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार खेळी खेळली. अभिषेकचे शतक हुकले तरी. त्याने 69 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 87 धावा केल्या.

तर साई सुदर्शनने 52 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार लगावत नाबाद 58 धावा केल्या. अभिषेक बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने 12 चेंडूत 1 चौकार-2 षटकार खेचले आणि नाबाद 21 धावा करुन टीम इंडियाला 9 विकेटने दणदणीत विजय मिळवून दिला.

Team India
Emerging Women's Asia Cup 2023: भारताच्या पोरी आशियात भारी! फायनलमध्ये बांगलादेशला पराभूत करत जिंकले विजेतेपद

भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला

यूएई आणि नेपाळ विरुद्ध बॅक टू बॅक विजय मिळवून टीम इंडियाने ग्रुप बी पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. दोन सामने जिंकल्यानंतर, संघाचे 4 गुण आणि नेट रनरेट +3.792 आहे.

सऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर 4 गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रनरेट +2.875 आहे. तिसऱ्या स्थानावर नेपाळ (Nepal) आहे, ज्याचे दोन पराभवानंतर 0 गुण आहेत आणि NRR -2.958 आहे. युएई चौथ्या स्थानावर आहे. सामन्यातील पराभवानंतर ज्याचे 0 गुण आणि -3.255 NRR आहेत.

अ गटात अफगाणिस्तान अव्वल स्थानावर

अ गटात, अफगाणिस्तान 2 सामने जिंकून आणि +0.838 च्या नेट रनरेटने 4 गुणांसह शीर्षस्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर बांगलादेश आहे, ज्याने एक सामना जिंकला तर एकामध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

बांगलादेशचे 2 गुण आणि NRR +1.731 आहे. दोनपैकी एक सामना जिंकून श्रीलंका 2 गुण आणि +0.370 च्या नेट रनरेटने तिसऱ्या स्थानावर आहे. ओमानने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. त्याचे 0 गुण आणि -2.819 NRR आहेत.

Team India
Emerging Women's Asia Cup 2023: श्रेयंकाची भन्नाट बॉलिंग! 2 धावात घेतल्या 5 विकेट्स, भारताने 32 चेंडूतच जिंकली मॅच

19 जुलैला पाकिस्तानविरुद्ध सामना होणार

भारत-पाकिस्तान सामना 19 जुलै रोजी होणार आहे. स्पर्धेतील गट सामन्यांमध्ये प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. यानंतर दोन्ही गटांतून दोन उपांत्य फेरी होतील आणि शेवटी 23 जुलै रोजी अंतिम सामना होईल.

सध्याचा गतविजेता बांगलादेश आहे. ज्याने 2019 ची आवृत्ती जिंकली. तर टीम इंडियाने 2013 ची उद्घाटन आवृत्ती जिंकली आहे. 2017 आणि 2018 च्या आवृत्त्या श्रीलंकेने जिंकल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com