Donavon Ferreira: यंदाच्या आयपीएलमध्ये (2023) कोलकाता नाइट रायडर्सचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहने गुजरात टायटन्सविरुद्ध 5 चेंडूत 5 षटकार मारुन खळबळ उडवून दिली होती. रिंकूच्या करिष्माई फलंदाजीमुळे केकेआरने गुजरातविरुद्धचा सामना जिंकला होता. यातच आता, दक्षिण आफ्रिकेच्या डोनोव्हान फरेरानेही असेच काहीसे केले. फरेराने T10 मध्ये वेगवान फलंदाजी करुन झिम्बाब्वेमध्ये दहशत निर्माण केली.
दरम्यान, झिम्बाब्वेमधील T10 मध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे फरेराला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळाले. डोनोव्हान फरेराने जिम आफ्रो T10 लीगमध्ये केपटाऊन सॅम्प आर्मीविरुद्ध 33 चेंडूत 87 धावा केल्या. या डावात त्याने करीम जनातला एका षटकात सलग 5 षटकार ठोकले.
दुसरीकडे, डोनोव्हान फरेरा इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएल 2023 च्या लिलावात राजस्थान संघाने फरेराला 50 लाखांमध्ये खरेदी केले होते. लिलावात फरेराची बेस प्राइज 20 लाख होती. आयपीएल व्यतिरिक्त, फरेरा दक्षिण आफ्रिका T20 लीगमध्ये जोबर्ग सुपर किंग्जकडून खेळतो. जरी फरेराला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
25 वर्षीय फरेराची क्रिकेट कारकीर्द फारशी चांगली नाही. तो आतापर्यंत एकूण 5 प्रथम श्रेणी, 15 लिस्ट ए आणि 37 टी-20 सामन्यांमध्ये दिसला आहे. त्याने फर्स्ट क्लासमध्ये 443 धावा केल्या आहेत, तर लिस्ट ए मध्ये त्याच्या 308 धावा आहेत. टी-20 मध्ये फरेराने 703 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, गोलंदाजीत फरेराने फर्स्ट क्लास आणि टी-20 मध्ये 10-10 विकेट घेतल्या आहेत, तर लिस्ट ए मध्ये त्याच्याकडे फक्त तीन विकेट आहेत.
T20I मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ: एडन मार्कराम (क), टेम्बा बावुमा, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सन, सिसांडा मगला, केशव महाराज, लुंगी न्गिडी, ताब्रीस्तान, टायब्रीस्तान स्टब्स, लिजाड विल्यम्स आणि रॅसी व्हॅन डेर डसेन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.