ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकून एश्ले गार्डनरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली क्रिकेटर

ICC Player of the Month for July 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी 'प्लेयर ऑफ द मंथ'चा पुरस्कार जाहीर केला.
Ashleigh Gardner
Ashleigh Gardner Dainik Gomantak
Published on
Updated on

ICC Player of the Month for July 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी 'प्लेयर ऑफ द मंथ'चा पुरस्कार जाहीर केला. ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू एश्ले गार्डनरने एलिस पेरी आणि नताली स्किव्हर यांना मागे टाकत जुलै महिन्यातील महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकला.

गार्डनरला जूनमध्ये प्लेअर ऑफ द मंथ म्हणूनही निवडण्यात आले. तिने एकूण चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. या वर्षी फेब्रुवारी आणि डिसेंबर 2022 मध्येही तिने हा पुरस्कार जिंकला होता. गार्डनरने मोठा इतिहास रचला आहे.

सलग महिन्यांत ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकणारी ती पहिली क्रिकेटर (पुरुष-महिला) ठरली आहे. याशिवाय वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली खेळाडू आहे.

दरम्यान, जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या (England) ऍशेस मालिकेत गार्डनरने चमकदार कामगिरी केली होती. तिने टी-20 आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये बॅट आणि बॉलने आपला जलवा दाखवून दिला.

आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही तिने छाप सोडली होती. गार्डनरने संपूर्ण महिन्यात आठ एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 232 धावा केल्या आणि 15 बळी घेतले.

Ashleigh Gardner
Team India: 'प्लेअर ऑफ द मंथ' साठी या दोन खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा, ICC घेणार अंतिम निर्णय

दुसरीकडे, "जुलैसाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार जिंकणे आणि हा पुरस्कार परत मिळवणारी पहिली खेळाडू बनणे हा खूप मोठा सन्मान आहे. महिलांची ऍशेस मालिका आणि आयर्लंड दौऱा खूप व्यस्त होता.

मी खरोखरच ऑस्ट्रेलियन संघाने जे काही साध्य केले ते पाहून प्रभावित झाले," असे गार्डनर म्हणाली. या काळात मी बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली याचा वैयक्तिकरित्या आनंद आहे, असेही ती पुढे म्हणाली.

Ashleigh Gardner
ICC मेन्स टेस्ट प्लेयर ऑफ द ईयर अवार्ड 2021 मध्ये 'या' भारतीय खेळाडूची झाली निवड

त्याचबरोबर, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सची जुलै महिन्यातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याने जॅक क्रॉली आणि नेदरलँड्सचा (Netherlands) स्टार खेळाडू बास डी लीडे यांना मागे टाकून ICC प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जिंकला.

वोक्सला संयुक्तपणे ऍशेसमधील मालिकेतील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. त्याने अवघ्या तीन सामन्यांमध्ये 3.4 च्या इकॉनॉमी रेटने 22 विकेट घेतल्या. त्याने 32 आणि नाबाद 36 धावांची खेळीही खेळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com