Ashes Series 2023: स्टुअर्ट ब्रॉडने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला इंग्लिश क्रिकेटर!

Ashes Series 2023: इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ऍशेस मालिकेच्या इतिहासात मोठी कामगिरी केली आहे.
Stuart Broad
Stuart BroadDainik Gomantak
Published on
Updated on

Ashes Series 2023: इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ऍशेस मालिकेच्या इतिहासात मोठी कामगिरी केली आहे. शेवटच्या कसोटी सामन्यातच तो ऍशेस मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. आता पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने आणखी एक मोठी कामगिरी करुन इतिहास रचला. स्टुअर्ट ब्रॉड हा ऍशेस मालिकेत 150 बळी घेणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे.

दरम्यान, इंग्लंडकडून ऍशेस मालिकेच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम यापूर्वी इयान बॉथमच्या नावावर होता, ज्याने 148 बळी घेतले होते. मात्र, शेवटच्या सामन्यात त्याला ब्रॉडने मागे टाकले आणि आता तो इंग्लिश संघासाठी 150 बळींचा टप्पा गाठणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. उस्मान ख्वाजाला एलबीडब्ल्यू आऊट करताच त्याने 150 विकेट्स टप्पा गाठला.

Stuart Broad
Ashes Series 2023: शेवट गोड करण्यासाठी इंग्लंड तयार! पाचव्या कसोटीसाठी प्लेइंग 11 जाहीर

दुसरीकडे, ब्रॉड ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेतील 40 वा सामना खेळत आहे. या सामन्यांमध्ये त्याने 150 विकेट घेतल्या आहेत. तो 8 वेळा पाच विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला आहे, तर एकदा त्याने एका सामन्यात 11 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय, त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 15 धावांत 8 बळी. या मालिकेतही ब्रॉड दोन्ही संघांकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.

Stuart Broad
Ashes Series 2023: हॅरी ब्रूकचा मोठा धमाका, इंग्लंडसाठी केवळ 18 कसोटी डावांमध्ये रचला इतिहास

ऍशेसमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स

स्टुअर्ट ब्रॉड - 150 विकेट्स

इयान बोथम - 148 विकेट्स

बॉब विलिस - 128 विकेट्स

जेम्स अँडरसन - 116 विकेट्स

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com